Amazon Ad

तुपकरांचे शिलेदार पोहचतायेत घराघरात! मतदारसंघातील ८० टक्के गावांमध्ये पोहोचले तुपकरांचे निर्धार परिवर्तन अभियान

 
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने शेतकरी नेते रविकांत तुपकर निर्धार परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून गावोगावी फिरत आहेत. तर रविकांत तुपकरांच्या स्वाभिमानी शिलेदारांनी देखील जिल्हाभर निर्धार परिवर्तन अभियान हाती घेतले आहे. प्रत्येक गावात आणि गावातील प्रत्येक घरात पोहोचून रविकांत तुपकर यांनी आजवर केलेली आंदोलने आणि चळवळ व रविकांत तुपकरांचे विचार मांडण्यासह परिवर्तनाचा निर्धार करत आहेत. जिल्ह्यातील ८०% गावांमध्ये हे अभियान पोहोचले आहे, हे विशेष. रविकांत तुपकर यांच्यासाठी घरची ठेचा-भाकरी खावून हजारो पावले दररोज फिरत असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे.
रविकांत तुपकर यांच्या माध्यमातून शेतकरी, कष्टकरी, तरुण आणि सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज लोकसभा सभागृहात पोहोचावा यासाठी जिल्ह्यात सध्या जोरदार वातावरण तयार होत आहे. गेल्या २२ वर्षापासून शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, तरुण आणि सर्वसामान्य जनतेसाठी रविकांत तुपकर नावाच वादळ सत्ताधारी तसेच प्रस्थापितांविरोधात लढा देत आहे. शेकडो केसेस तुपकरांनी अंगावर घेतल्या, पोलिसांचा लाठ्याकाठ्या झालेल्या, तुरुंगवास भोगला, तडीपारी सॊसली, अगदी आक्रमक तसेच जीवघेणी आंदोलने केली. त्यांच्या आंदोलनामुळे शेतकऱ्यांच्या पदरात नेहमीच काही ना काही मिळाले हे देखील वास्तव आहे. सर्वसामान्यांचा हा आवाज लोकसभेत पोहोचला पाहिजे या उद्देशाने आता गाव खेड्यातील तसेच शहरी भागातील नागरिक स्वतःहून समोर येत आहेत. 
निर्धार परिवर्तन यात्रेला प्रतिसाद
तिकडे रविकांत तुपकर यांची निर्धार परिवर्तन यात्रेला जिल्ह्यात जोरदार प्रतिसाद मिळला. त्यांच्या सभांना गावोगावी प्रचंड गर्दी होत आहे, प्रत्येक ठिकाणी त्यांचे जोरदार स्वागत होत आहे. तर नागरिक स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन लोकसभा निवडणुकीच्या खर्चासाठी लोकनिधी जमा करत आहेत. यामुळे जिल्ह्यात रविकांत तुपकरांच्या बाजूने परिवर्तनाची एक लाट निर्माण झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. तर रविकांत तुपकरांच्या स्वाभिमानी शिलेदारांनी परिवर्तन निर्धार अभियान हाती घेतले आहे. भाऊ तुम्ही गेली २२ वर्ष घरादारावर तुळशीपत्र ठेवून केवळ सर्वसामान्य जनतेसाठी लढा देत आहात. अनेक केसेस तुम्ही अंगावर घेतल्या, पोलिसांचा लाठीमार सहन केला, तुरुंगवास भोगला, तडीपारी सहन केली. अनेक संकटे तुमच्यावर आली. जिवाची परवा न करता तुम्ही शेतकरी, कष्टकरी व सर्व सामान्यांसाठी, तरुणांसाठी आंदोलने केली. या सर्व मोबदल्यात तुम्ही कधीच काही मागितले नाही. त्यामुळे आता तुमच्या पदरात मतांचे दान टाकून जिल्ह्यात परिवर्तन घडविणे ही आमची जबाबदारी आहे. आता ही लढाई तुमची नाही तर ही लढाई आमची आहे आणि आमची लढाई आम्ही जिंकणारच असा निर्धार समर्थक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला असून गेल्या ०७ मार्चपासून प्रत्येक तालुक्यात पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वेगवेगळ्या टीम गावोगावी जाऊन प्रत्येक घरापर्यंत पोहोचत आहेत. 
प्रत्येक घरात रविकांत तुपकर यांच्या कार्याची माहिती देत, येणाऱ्या लोकसभेत परिवर्तन घडवायचेच अशी शपथ हे कार्यकर्ते घेत आहेत. एकंदरीत प्रचार सुरू होण्यापूर्वीच रविकांत तुपकरांच्या स्वाभिमानी शिलेदारांनी जिल्ह्यातील ८० टक्के गावांमध्ये पोहोचून रविकांत तुपकरांचे नाव घराघरात पोहोचविले आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात परिवर्तनाचे वारे वाहू लागले असून जिल्ह्यात परिवर्तन घडणारच असे चित्र दिसून येत आहे.