एल्गार रथयात्रेचा आजचा मुक्काम धामणगाव बढे गावात! रविकांत तुपकरांची थोड्याच वेळात जाहीर सभा! गावोगावच्या शेतकऱ्यांना तुपकर देत आहेत एल्गार महामोर्चाचे आवतन..

 
Ndhdj
धामणगाव बढे( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी एल्गार रथयात्रा सुरू केली आहे. ५ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या या यात्रेचा आज, १६ नोव्हेंबरला बारावा दिवस आहे. एल्गार रथयात्रा आज मोताळा तालुक्यात दाखल झाली. आजचा रात्रीचा मुक्काम धामणगाव बढे येथे असून तिथे जाहीर सभेला रविकांत तुपकर संबोधित करणार आहेत.
सोयाबीन आणि कापसाच्या भाववाढीसाठी रविकांत तुपकर यांनी आंदोलनाचे रणशिंग फुंकलेले आहे. २० नोव्हेंबरला बुलडाणा शहरात शेतकऱ्यांचा विराट एल्गार महामोर्चा होणार आहे. एल्गार रथयात्रेच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या गावोगावी फिरून रविकांत तुपकर शेतकऱ्यांना एल्गार मोर्चाचे आवतन देत आहेत. या एल्गार रथयात्रेला जिल्हाभरातील शेतकरी शेतमजुरांचा उदंड प्रतिसाद मिळत असून २० नोव्हेंबरला बुलडाण्यात शेतकऱ्यांची अभूतपूर्व गर्दी होण्याची शक्यता आहे.