वन बुलडाणा मिशनच्या परिवर्तन रथयात्रेचा आज तिसरा दिवस! गावोगावी मिळतोय भक्कम प्रतिसाद; संदीप शेळके म्हणाले, परिवर्तन होणार, ही काळ्या दगडावरची रेख! रात्री मोताळ्यात मुक्काम.!

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): १० फेब्रुवारीपासून मोताळा तालुक्यातील नळकुंड गावातून सुरू झालेल्या वन बुलडाणा मिशनच्या परिवर्तन रथयात्रेचा आज, १२ फेब्रुवारीला तिसरा दिवस आहे. प्रत्येक गावखेड्यात या रथयात्रेला जोरदार प्रतिसाद मिळत असून गावागावात वन बुलडाणा मिशन संदीप शेळके यांचे दिमाखात स्वागत होत आहे. जनतेने आता जिल्ह्याच्या मगासलेपणाचा कलंक पुसण्याचा निर्धार केला आहे, त्यासाठी परिवर्तन आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता परिवर्तन होणार ही काळ्या दगडावरची रेख असल्याचा विश्वास संदीप शेळके यांनी व्यक्त केलाय.
 परिवर्तन रथयात्रा आज तिसऱ्या दिवशी लिहा, आव्हा, निपाना, माळेगाव, सावरगाव, शेलगाव बाजार, जहागीरपूर, माकोडी, टेंभी, पिंप्री गवळी, दाभाडी, घुस्सर, शेलापूर, तळणी, पिंपळवाटी, तालखेड, डीडोळा, चिंचपूर, रिधोरा मार्गे मुक्कामी मोताळ्यात पोहचणार आहे.