संविधान जागर यात्रेचा आज चौथा दिवस! उत्रादा येथे सायंकाळची सभा; मुक्काम धोत्रा भनगोजी गावात

 
चिखली
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): २७ जानेवारी पासून काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी चिखली विधानसभा मतदारसंघात संविधान जागर यात्रा काढली. ९ दिवसात १०२ गावे तर ७०० किलोमीटरचा प्रवास ही यात्रा करणार आहे. मतदार संघातील अनेक गावं आता पर्यंत यात्रेने पिंजून काढली आहे. यामध्येच पुढे आज ३० जानेवारीला यात्रेचा चौथा दिवस उजाडला. सरकारकडून संविधानाची पायमल्ली करण्यात येत आहे, त्यामुळे गाव खेड्यात संविधानाचा जागर करणे गरजेचे आहे असे राहुल बोंद्रे यात्रेदरम्यान सांगत आहेत.
Yatra
Add
आज सकाळीच डासाळा गावातून यात्रा सुरू झाली. आजचा मुक्काम धोत्रा भनगोजी या गावात होणार असून तत्पूर्वी उत्रादा गावात सायंकाळची भव्य संवाद सभा पार पडणार आहे. दरम्यानच दुपारच्या वेळी टाकरखेड, करवंड,खामखेड ,गोंदनखेड, कव्हळा अश्या गावांमध्ये संविधान जागर यात्रा पोहचेल. त्यांनतर सावरखेड, करणखेड, दहिगाव, बोरगाव काकडे, पेठ अश्या गावांना भेटी देत सायंकाळी उत्रादा येथे भव्य जाहीर सभा पार पडणार आहे. रात्रीचा मुक्काम धोत्राभनगोजी गावात केल्यानंतर, उद्या सकाळी पाचव्या दिवसासाठी जागर यात्रेला पुन्हा सुरुवात होईल.