संदीप शेळकेंच्या वाढदिवसानिमित्त आज भरगच्च कार्यक्रम! चिखली ते बुलडाणा मोटारसायकल रॅली ठरली सुपरहिट...

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):वन बुलढाणा मिशनचे संकल्पक तथा शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीप शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त आज बुधवार, १३ मार्च रोजी दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये सकाळी ७ वाजता चिखलीत रेणुका मातेचे दर्शन घेऊन त्यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी साकडे घातले. आणि छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांचे पूजन करून अभिवादन केले. त्यानंतर चिखली ते बुलढाण्यातील गर्दे वाचनालय अशी बाईक रॅली काढण्यात आली. त्यावेळी संदीप शेळकेंचे असंख्य हितचिंतक सहभागी झाले होते. आज दिवसभर संदीप शेळके गर्दे वाचनालयाच्या सभागृहात समस्त हितचिंतकांच्या शुभेच्छा स्वीकारणार आहेत.
Ss
                       Add. 👆
  सकाळपासूनच संदीप शेळके यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या हितचिंतकांची मोठी गर्दी जमली आहे. यादरम्यान सकाळी चिखली ते बुलडाणा अशी निघालेली बाईक रॅली सुपरहिट ठरली. वन बुलढाणा मिशनचे पदाधिकारी, शेकडो सदस्य सहभागी झाले होते. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचे व्हिजन मांडून लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्धार संदीप शेळके यांनी आधीच घेतला आहे. त्यामुळे जिल्हाभरातून त्यांना प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळतोय. दिवसेंदिवस त्यांची लोकप्रियता वाढत असल्याचे दिसत आहे. विकासाची ब्ल्यू- प्रिंट त्यांच्याजवळ तयार असल्याने विकासाचे राजकारण ते करत आहेत. त्यामुळे गावागावात त्यांच्या परिवर्तन रथयात्रेत मोठी गर्दी दिसून येत आहे.