ही निवडणूक जिल्ह्याचं भवितव्य घडवणारी! संदीप शेळकेंचे प्रतिपादन! म्हणाले सत्ताधाऱ्यांनी फक्त सत्तेचा घोळ घातला; खामगाव तालुक्यात परिवर्तन रथयात्रेला मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद!

 
Sandeep shelke

खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सत्ताधाऱ्यांनी केवळ सत्तेचा घोळ घातला आहे. आज एका पक्षात तर उद्या दुसऱ्या.. कार्यकर्ते सुद्धा संभ्रमात पडलेत. या सगळ्यात सामान्य जनतेची मोठी फसवणूक झाली आहे. त्यामुळे जनतेने आता परिवर्तनाचा निर्धार पक्का केला आहे. अशा शब्दांत सत्ताधारी पुढार्‍यांच्या राजकारणावरून टीकास्त्र सोडत यंदाची ही निवडणूक जिल्ह्याचे भवितव्य घडवणारी ठरणार असल्याचे प्रतिपादन वन बुलढाणा मिशनचे संस्थापक तथा शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीप शेळके यांनी केले.खामगाव तालुक्यातील बोरी गावात परिवर्तन रथयात्रेच्या सभेत आज ५ मार्च रोजी ते बोलत होते.

वन बुलढाणा मिशनची परिवर्तन रथयात्रा खामगाव तालुक्यात सुरू आहे. आज मंगळवारच्या सकाळी उमरा, पळशी खुर्द, संभापूर, बोरी आडगाव या गावात परिवर्तनाचा जागर करण्यात आला. त्यावेळी बोरी आडगाव येथील सभेत बोलताना संदीप शेळके यांनी सध्या सुरू असलेल्या राजकीय वातावरणावर भाष्य केले. ते म्हणाले, आजवर सामान्य जनतेने सत्ताधाऱ्यांना सतत प्रेम दिल. पण सत्ताधारी केवळ सत्तेचा घोळ करत राहिले. त्यांनी कधीच जनतेच्या हिताचा विचार केला नाही आणि यामुळेच सामान्य जनता प्रस्थापित पुढाऱ्यांना वैतागली आहे. जनतेला संकट मुक्त करण्यासाठीच वन बुलढाणा मिशन ने परिवर्तन रथयात्रा सुरू केली असल्याचे ते म्हणाले. जिल्ह्यात परिवर्तनाच्या माध्यमातून विकासाची गंगा आणायची आहे. नदीजोड प्रकल्प ,प्रत्येक तालुक्यात एमआयडीसी, उच्च दर्जाचे शिक्षण, महिला सक्षमीकरण, सिंचनाची सोय, असा विस्तारित विकास अजेंडा घेऊन परिवर्तनाच्या दिशेने रथयात्रा मार्गक्रमण करत आहेत. त्यामुळे परिवर्तनासाठी जनतेने संधी दिल्यास विकासाच्या सर्व बाबींवर प्रत्यक्षात अंमलबजावणी केला जाईल. इतकच नाही आजवर कुठेच असा विकास झाला नाही. तो विकास मातृत्व बुलडाणा जिल्ह्याला पाहायला मिळणार असल्याचा शब्द संदीप शेळके यांनी दिला.