BREAKING मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी आलेला महिलांना पोलिसांनी रोखले; पोलीस ठाण्यात केले स्थानबद्ध

 
photo

चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखलीत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा आहे. दरम्यान सभास्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यासाठी आलेल्या महिलांना पोलिसांनी रोखल्याचे वृत्त आहे.

add

 आशासेविका त्यांच्या मागण्यांचे निवेदन देण्यासाठी चिखली येथील तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर आल्या होत्या. पोलिसांना याची कुणकुण लागताच पोलिसांनी आशा सेविकांना पोलीस ठाण्यात स्थानबद्ध केले. ५ आशा सेविकांच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी पाठवण्यात येईल असे पोलीस सूत्रांनी सांगितले.