संवाद मेळाव्यांतून जिल्ह्यात पुन्हा गुंजणार परिवर्तनाचा आवाज;
वन बुलढाणा मिशनचे संदीप शेळकेंची आज रोहिणखेड येथे सभा! जिल्ह्याच्या विकासाबाबत मते जाणून घेण्यासाठी नागरिकांशी साधणार संवाद
Nov 5, 2023, 13:42 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा मिशनच्या संवाद मेळाव्यांमधून जिल्ह्यात पुन्हा परिवर्तनाचा आवाज गुंजणार आहे. जिल्ह्याच्या विकासाबाबत मते जाणून घेण्यासाठी राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष तथा वन बुलढाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके जनता जनार्दनासोबत संवाद साधणार आहेत. आज ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता मोताळा तालुक्यातील रोहिणखेड येथे त्यांची सभा होणार आहे. वन बुलढाणा मिशनच्या जाहीरनामा जनतेचा या कार्यक्रमांतर्गत हा १६ वा संवाद मेळावा आहे. चिखली तालुक्यातील ईसोली येथून १७ सप्टेंबर रोजी संवाद मेळाव्यास प्रारंभ झाला होता.
वन बुलडाणा मिशन ही संदीप शेळके यांच्या नेतृत्वात कार्यरत एक राजकीय लोकचळवळ आहे. बुलढाणा जिल्हा विकासात प्रथम क्रमांकावर आला पाहिजे हे ध्येय गाठण्यासाठी ही लोकचळवळ कार्यरत आहे. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी यामाध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहे. जिल्ह्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी अष्टमीला संदीपदादा शेळके यांनी बुलडाणा ते चिखली अशी पायदळ परिवर्तन पदयात्रा काढली. बुलडाण्याची जगदंबा माता आणि चिखलीची रेणुका देवी या दोन शक्तीपीठांना साकडे घालण्यात आले. ऑक्टोबर हिट असतांना सुद्धा यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तर संवाद मेळाव्याचा माध्यमातून आतापर्यंत १५ सभा झाल्या आहेत.
जनतेचा जाहीरनामा कार्यक्रमांतर्गत जनतेशी संवाद साधून जिल्ह्याच्या विकासाबाबत मते जाणून घेण्यात येणार आहेत. त्याद्वारे जनतेचा जाहीरनामा मांडण्यात येणार आहे. राजकीय पक्ष आपला जाहीरनामा मांडतात. संदीप शेळके हे जनतेचा जाहीरनामा मांडणार आहेत, हे विशेष....