Amazon Ad

"ठाकरी तोफ" थोड्याच वेळात चिखलीत धडाडणार! बंडखोरांना घेणार फैलावर? उद्धव ठाकरेंच्या सभेसाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त! नरेंद्र खेडेकरांकडून तयारीचा आढावा

 
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज,२२ फेब्रुवारीपासून २ दिवस जिल्ह्याच्या मुक्कामी दौऱ्यावर आहेत. जिल्ह्यात ६ ठिकाणी ते सभांना संबोधित करणार असल्याने जिल्ह्यात आज आणि उद्या राजकीय वातावरण गरमागरम राहणार आहे. आज,दुपारी चिखलीत ठाकरेंची तोफ धडाडणार आहे, ठाकरे जिल्ह्यातल्या बंडखोर खासदार आमदारांवर निशाणा साधण्याची शक्यता आहे.
बुलडाणा जिल्ह्यातून खासदार जाधव, आ.गायकवाड आणि आ. रायमुलकर या तिघांनी ठाकरेंशी साथ सोडून शिंदेंची साथ पकडली होती. दरम्यान आता लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीत बुलडाणा लोकसभा मतदारसंघावर दावा सांगितला आहे. कदाचित आज किंवा उद्या शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर यांची उमेदवारी उद्धव ठाकरे जाहीर करतील अशी शक्यता आहे. दरम्यान आज राजा टॉवर परिसरात होणाऱ्या सभेची जय्यत तयारी करण्यात आली असून नरेंद्र खेडेकर स्वतः सभेच्या तयारीवर लक्ष ठेवून आहेत. सभेसाठी पोलिसांनी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.