चिखलीत आज उसळणार भगवा जनसागर! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जाहीर सभा; लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार! खा. प्रतापराव जाधवांसाठी "हे" मैदान ऐतिहासिक! इतिहासाची पुनरावृत्ती होणार?

 
Hdhd
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज,१३ जानेवारीला जिल्ह्यात येणार आहेत.. चिखलीच्या तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर ते जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. आमदार पात्र - अपात्रतेचा निकाल लागल्यानंतर होणाऱ्या या सभेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे. याच सभेत ते आगामी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याची शक्यता आहे.खा.प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनात या सभेची पूर्ण तयारी झाली असून मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी चिखली नगरी भगवेमय झाली आहे..
Shivsena
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मिशन ४८ अंतर्गत शिवसंकल्प अभियान राबविल्या जात आहे. या अभियानाअंतर्गत मुख्यमंत्री शिंदे राज्यभरात सभा घेणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज चिखलीत मुख्यमंत्री शिंदे जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. 
  खा. प्रतापराव जाधवांसाठी "हे" मैदान ऐतिहासिक...
 चिखलीचे तालुका क्रीडा संकुलाचे मैदान खा.जाधवांच्या राजकीय कारकिर्दीसाठी फायद्याचेच ठरले आहे. १५ वर्षे आमदारकी गाजवल्यानंतर २००९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रतापराव जाधवांसाठी पहिली सभा याच मैदानात झाली होती. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी ही सभा घेतली होती. त्यानंतरही खा.जाधव यांच्या प्रचारासाठीच्या सभा याच मैदानात झाल्या. याआधीच्या तिन्ही लोकसभा निवडणुका खा.जाधव यांनी मोठ्या मताधिक्याने जिंकल्या. आता यावेळीही आचासंहितेपूर्वीची पहिली सभा चिखलीच्या मैदानात होत आहे, त्यामुळे या निवडणुकीत देखील इतिहासाची पुनरावृत्ती होणार असल्याचे महायुतीचे कार्यकर्ते ठामपणे सांगत आहेत..