बुलडाण्यात महाविकास आघाडीत बिघाडी? काँग्रेसही उमेदवार देण्याच्या तयारीत! हर्षवर्धन सपकाळ्यांच्या पोस्ट ने राजकीय वर्तुळात खळबळ! सपकाळ म्हणाले, उद्या....

 
हद्द
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): दोन दिवसांपूर्वी आमदार संजय गायकवाडांनी लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करून महायुतीत खळबळ उडवून दिली होती. आता ते प्रकरण शांत झाले असतांनाच महाविकास आघाडीतून राजकीय वातावरण तापवणारी बातमी समोर आली आहे. माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी एक्स या मायक्रो ब्लॉगिंग साइटवर एक पोस्ट करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. महाविकास आघाडीत बुलढाणा लोकसभेची जागा उभाठा शिवसेनेला सुटून नरेंद्र खेडेकरांची उमेदवारी जाहीर झाली असतानाच आता काँग्रेसही या मतदारसंघात उमेदवार देणार असल्याची चर्चा रंगली आहे, खुद हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील याला दुजोरा दिलाय..
कनक
नरेंद्र खेडेकर यांची उमेदवारी जाहीर होण्याआधी काँग्रेसही बुलडाणा लोकसभा मतदारसंघावर दावा सांगत होती. बुलडाण्यात तर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी राजीनामा नाट्य देखील घडवले होते. मात्र उबाठा शिवसेना या जागेसाठी आग्रही होती. महायुतीचा उमेदवार घोषित होण्याआधीच उबाठा शिवसेनेने नरेंद्र खेडेकर यांची उमेदवारी घोषित करून टाकली. खेडेकर यांच्या नावाचा एबी फॉर्म देखील शिवसेना जिल्हाप्रमुख बुधवंत घेऊन आले आहेत. एकीकडे नरेंद्र खेडेकर महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा व कार्यकर्ता मेळावा घेण्यात व्यस्त असताना तिकडे मुंबई - दिल्ली दरबारातून काही होऊ शकत का? याची चाचपणी हर्षवर्धन सपकाळ करीत आहेत. महाराष्ट्रात उबाठा शिवसेनेने आधीच उमेदवार जाहीर केल्याने काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे काही मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढती ठेवण्याचा काँग्रेस विचार करीत आहे. त्यात बुलडाणा लोकसभा मतदारसंघासात देखील मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते. असे झाल्यास हर्षवर्धन सपकाळ उमेदवार होऊ शकतात. यासंदर्भात हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी संपर्क साधला असता, चर्चा सुरू आहे..उद्या काय निर्णय घ्यायचा तो घेऊ असे सपकाळ म्हणाले.