खा.प्रतापराव जाधवांची ताकद वाढली! उबाठा गटाचे सहसंपर्क प्रमुख भास्कर मोरे यांच्यासह शरद हाडेंचा शिवसेनेत प्रवेश

 
गतफन
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खा.प्रतापराव जाधव यांची ताकद पुन्हा एकदा वाढली आहे. मतदारसंघात अत्र तत्र सर्वत्र दमदार प्रतिसाद मिळत असताना आता दोन दमदार चेहऱ्यांची शिवसेनेत एन्ट्री झाली आहे. एकेकाळी संयुक्त शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रमुख कारकीर्द गाजविणारे व आतापर्यंत उबाठा शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क असणारे भास्कर मोरे आता खा.जाधव यांच्या दिमतीला आले आहेत. याशिवाय माजी जिल्हा परिषद सदस्य शरद हाडे यांनी देखील खा.प्रतापराव जाधव यांचे नेतृत्व स्वीकारत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे उबाठा गटाला मोठा धक्का बसला असून खा.जाधव यांची ताकद वाढली आहे 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात खा.जाधव यांनी हजारो कोटींची विकासकामे केली आहेत. देशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांचे सरकार येणार आहे. खा.जाधव हे देखील मोदींच्या ४०० पारच्या नाऱ्यातील एक असणार आहेत. खा.जाधव यांची विकासात्मक दृष्टी आहे. त्यांच्या या विकास कामाला बळ मिळावे म्हणून आपण शिवसेनेत प्रवेश केला असल्याचे भास्कर मोरे यावेळी म्हणाले. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत खासदार प्रतापराव जाधव यांचा मोठा विजय होईल यासाठी आपण प्रयत्न करू असे आश्वासन मोरे आणि हाडे यांनी दिले. यावेळी त्यांच्यासोबत उबाठाचे कृष्णा जाधव, गजानन ठेंग, मनोज वाघमारे आदि शेकडों कार्यकर्ते उपस्थित होते.