जिल्ह्यातल्या ७७ ग्रामपंचायतींचे राजकारण भर उन्हात तापणार! पोटनिवडणुकीसाठी १८ मे ला होणार मतदान

 
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यातल्या ७७ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणूकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.  भर उन्हाळ्यात या निवडणुका होणार असून १८ मे रोजी मतदान तर दुसऱ्याच दिवशी मतमोजणी होणार आहे.
 

सदस्यांचे निधन, राजीनामा, अपात्रता किंवा अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या पदांसाठी या निवडणुका होणार आहेत. १८ एप्रिलला संबधित तालुक्यांचे तहसीलदार निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करतील. २५ एप्रिल ते २ एप्रिल या कालावधीत उमेदवारी अर्ज भरता येईल. ३ मे रोजी अर्जांची छाननी होणार असून ८ मे रोजी दुपारी ३ पर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येईल. त्याच दिवशी उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात येईल. १८ मे रोजी सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच या कालावधीत मतदान होईल. १९ मे रोजी मतमोजणी होणार आहे.