धाकधूक वाढली..! थोड्याच वेळात होणार मतमोजणीला सुरूवात! ८४ टेबलांवर होणार मतमोजणी; बुलडाण्यात जागोजागी पोलीस बंदोबस्त! मतमोजणीचे ताजे अपडेट मिळणार "बुलडाणा लाइव्हवर"...
Jun 4, 2024, 07:25 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लाखो बुलडाणेकरांना ज्या क्षणाची प्रतीक्षा होती तो क्षण आता अगदी जवळ आलाय..थोड्याच वेळात म्हणजेच ८ वाजेपासून बुलडाणा लोकसभा मतदासंघाची मतमोजणी सुरू होणार आहे. एकूण ८४ टेबलांवर ही मतमोजणी होणार असून २५ फेऱ्यांद्वारे मतमोजणी होणार आहे. १ एसपी, २ ॲडिशनल एसपी, ३० पीआय - एपीआय दर्जाच्या अधिकाऱ्यांसह, एसआरपी, सीआरपीएफ, दंगाकाबु पथकांसह शेकडो पोलिसांचा बंदोबस्त मलकापूर रोडवरील मतमोजणी केंद्र परिसरात लावण्यात आला आहे. प्रमुख उमेदवारांसह सर्वच उमेदवारांचे प्रतिनिधी समर्थक मतमोजणी केंद्र परिसरात जमायला सुरूवात झाली आहे. मतमोजणीच्या प्रत्येक फेरीचे ताजे अपडेट आज दिवसभर "बुलडाणा लाइव्ह"वर पाहता येणार आहेत..