BREKING जिल्ह्यात साडेचार कोटी रुपयांची कॅश पकडल्याची बातमी खोटी! कोणताही गुन्हा दाखल नाही;

सोशल मीडियावर फिरणारा मॅसेज खोटा; बुलढाणा पोलिसांचे स्पष्टीकरण! सायबर सेल कडून अफवा पसरवणाऱ्यांचा शोध सुरू..
 
Jfjf
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान होत आहे. दरम्यान सोशल मीडियावर एक मेसेज फिरत असून त्यात साडेचार कोटी रुपयांची रक्कम मेहकर मध्ये जप्त केल्याचे म्हटले आहे. शिवसेनेच्या तीन कार्यकर्त्यांना पकडण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याचाही उल्लेखही त्या व्हायरल मेसेज मध्ये करण्यात आला आहे, मात्र बुलढाणा पोलिसांनी याबाबतचे स्पष्टीकरण दिले असून अशी कोणतीही घटना बुलढाणा जिल्ह्यात झाली नाही. कोणताही गुन्हा दाखल झाला नाही, व्हायरल होणारा मेसेज हा फेक असल्याचे स्पष्टीकरण बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी दिले आहे. मेसेज व्हायरल करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून, मॅसेज तयार करणाऱ्यांचा शोध सायबर सेल कडून घेण्यात येत असल्याचेही एसपी सुनील कडासने यांनी सांगितले .
.