मागील लोकसभेत १८ एप्रिलला झाले होते मतदान;यंदा लोकसभा निवडणूक कधी? लाखो बुलडाणेकरांची उत्सुकता शिगेला

 
Maddan
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लाखो मतदारासह जिल्हावासीयांतील लोकसभा निवडणुकीच्या मुहूर्ताची उत्सुकता गगनाला भिडली आहे . याशिवाय  मतदारसंघाची निवडणूक कोणत्या टप्प्यात होणार याकडेही राजकीय  वर्तुळ व  मतदारांचे लक्ष वेधले आहे.

 मागील सन २०१९ च्या निवडणुकीची आचारसंहिता १० मार्चला लागू झाली होती. राज्यातील ४८ मतदारसंघाच्या निवडणुका ४ टप्प्यात पार पडल्या होत्या. बुलढाणा मतदारसंघाची निवडणूक दुसऱ्या टप्प्यात अर्थात १८ एप्रिल रोजी पार पडली होती . त्यापूर्वी १८ एप्रिलला अधिसूचना जारी करण्यात आली होती.

२६ मार्च ही अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत होती.२६ तारखेला नामांकन पत्रांची छानणी  करण्यात आली होती.२८ मार्च ही उमेदवारी  अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत होती.
 मागील लढतीत २३ मे रोजी मोजणी होऊन युतीचे प्रतापराव जाधव हे तिसऱ्यांदा खासदार झाले होते . मात्र लाखो बुलढाणावासीयांना तब्बल सव्वा   महिने निकालाची वाट पाहण्याची पाळी आली होती.


 या पार्श्वभूमीवर यंदा निवडणूक लांबली आहे. यामुळे यंदाच्या निवडणुकीच्या मुहूर्ताची उत्सुकता ताणल्या गेली आहे. उध्या शनिवारी निवडणूक कार्यक्रम व आचारसंहितेची घोषणा होऊ शकते असा व्यापक अंदाज आहे. प्रशासकीय वर्तुळातही ही चर्चा आहे. बुलढाण्याची  निवडणूक कोणत्या टप्प्यात पार पडते  हा देखील व्यापक उत्सुकतेचा विषय ठरला आहे.