संग्रामपूर जळगाव मध्ये झालेली अतिवृष्टी लोकप्रतिनिधींच्या हृदयाला पाझर फोडू शकली नाही; मदतीसाठी कुणाकडे पदर पसरायचा?संदीप शेळकेंचा सवाल! म्हणाले, जिल्ह्यात आता परिवर्तनाची नांदी..

 
जळगाव जामोद(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जळगाव जामोद संग्रामपूर तालुक्यात २२ जुलैला अतिवृष्टी झाली. शेकडो नागरिकांचे संसार उध्वस्त झाले, शेतीचे भरून न येणारे नुकसान झाले. एनडीआरएफ च्या निकषानुसार अतिवृष्टीग्रस्तांना मदत मिळायला हवी होती. मात्र ५ महिने होत आले तरी अद्याप मदत मिळाली नाही. गोरगरीब जनतेचे संसार उघड्यावर पडलेले असताना आम्ही निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींच्या हृदयाला पाझर कसा फुटत नाही? असा सवाल संदीप शेळके  यांनी उपस्थिती केला. जळगाव जामोद तालुक्यातील वडशिंगी येथे वन बुलडाणा मिशनची भव्य  संवाद सभा पार पडली, यावेळी ते बोलत होते. 
 

 ss

पुढे बोलतांना संदीप शेळके म्हणाले की, सध्या सत्ताकारणावर लोकप्रतिनिधींचा सारा फोकस आहे, जिल्ह्याचा विकास वाऱ्यावर आहे, स्वातंत्र्यानंतरची ७५ वर्षे होऊनही अजून आमच्या प्राथमिक गरजा संपल्या नाहीत. जिल्ह्याकडे वनसंपदा, भौगोलिक संपदा, ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा आहे मात्र तरीही आमच्या बुलडाणा जिल्ह्याची ओळख मागास जिल्हा अशी का आहे याबद्दल लोकप्रतिनिधींना जाब विचारण्याची गरज असल्याचेही संदीप शेळके म्हणाले. 

पदर कुणाकडे पसरायचा?

जळगाव जामोद, संग्रामपूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले. त्यावेळी नेत्यांनी येऊन फोटोसेशन केले, मदतीचे आश्वासन दिले.मात्र अद्याप मदत मिळाली नाही. आम्ही निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आमचे काम करीत नसतील तर गोरगरीब जनतेने कुणाकडे पदर पसरायचा असेही संदीप शेळके म्हणाले..


जिल्ह्यात आता परिवर्तनाची नांदी..

वन बुलडाणा मिशन ही जिल्ह्याच्या विकासाची लोकचळवळ आहे. आतापर्यंत जे झालं गेलं ते पार पडल..मात्र आता जिल्ह्याचा विकास कुणालाही थांबवता येणार नाही. जिल्ह्याच्या विकासासाठी आता जनतेच्या जाहीरनाम्यावर आपण काम करीत आहोत. जिल्हाभरातील हजारो नवतरुणांची फौज या चळवळीत सहभागी झाली आहे, ज्येष्ठ,श्रेष्ठ वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद या लोकचळवळीला आहे. जिल्ह्यात आता परिवर्तनाची नांदी आहे असेही संदीप शेळके म्हणाले.