पालकमंत्री उद्या जिल्हा दौऱ्यावर येणार! गारपीट, अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त भागाची करणार पाहणी! जिल्हा यंत्रणेकडून घेणार नुकसानीचा आढावा

 

बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा जिल्ह्यात गारपीट व अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान झाले असून, पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील रविवारी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यामध्ये जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून ते नुकसानीचा आढावा घेणार आहेत. पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील हे उद्या रविवारी छत्रपती संभाजीनगर येथून सकाळी ९ वाजता सिंदखेड राजा तालुक्यातील सावरगाव माळ येथे गारपीट व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करतील. 

त्यानंतर देऊळगाव राजा तालुक्यातील गोळेगाव, गिरोली आणि असोला जहागीर या गावातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करतील. सिंदखेड राजा तालुक्यातील पळसखेड चक्का येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर ते गारपीट व अवकाळी पावसामुळे बाधित शेतपिकांच्या नुकसानीसंदर्भात दुपारी १२.३० वाजता सिंदखेडराजा येथील पंचायत समिती सभागृहामध्ये जिल्हा यंत्रणेच्या संबंधित विभाग प्रमुखांसोबत आढावा घेतील. त्यांची दुपारी १.३० ते २.३० वाजेदरम्यान राखीव वेळ असेल. त्यानंतर ते सोईनुसार सिंदखेड राजा येथून छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील.