डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला कर्मयोगी स्व.तात्यासाहेब बोंद्रेंच्या प्रेरणास्थळाचा भूमिपूजन सोहळा! खा.मुकुल वासनिकांच्या हस्ते झाले भूमिपूजन! खा. वासनिकांनी दिल्या जुन्या आठवणींना उजाळा;

पहिल्या भेटीची आठवण सांगितली! प्रेरणास्थळ सर्वांना प्रेरणा देणारे ठरेल म्हणाले! पद्मश्री तात्याराव लहाने म्हणाले, आईवडिलांची सेवा करणारी  माणसंच आयुष्यात यशस्वी होतात! १२ सप्टेंबर यापुढे प्रेरणा दिन म्हणून साजरा करणार असल्याची राहुल बोंद्रेंची घोषणा

 
congress
चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): स्व. तात्यासाहेब तपस्वी होते..विचारांशी त्यांनी कधीही तडजोड केली नाही. चिखलीसारख्या ग्रामीण भागात तांत्रिक शिक्षणाची गंगा आणली..एवढं मोठं विश्व उभारल्यानंतर सुद्धा त्याचा त्यांना मोह नव्हता, त्यांनी वानप्रस्थाश्रम स्विकारला..अनुराधा परिवार उभारत असलेले त्यांचे प्रेरणास्थळ इथे येणाऱ्या प्रत्येकाला प्रेरणा देणारे, ऊर्जा देणारे ठरेल असे प्रतिपादन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस खा.मुकुल वासनिक यांनी केले. चिखली येथील अनुराधा नगरात तपोभूमी परिसरात कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे यांच्या प्रेरणास्थळाचा भूमिपूजन सोहळा खा.मुकुल वासनिक यांच्या हस्ते आज,१२ सप्टेंबर रोजी संपन्न झाला यावेळी आयोजित सभेत खा. वासनिक बोलत होते. यावेळी मंचावर पद्मश्री तात्याराव लहाने,    अनुराधा परिवाराचे सर्वेसर्वा  माजी आमदार राहुल बोंद्रे, आ. धिरज लिंगाडे, आ.किरण सरनाईक, माजी आ. रेखाताई खेडेकर, माजी आ. हर्षवर्धन सपकाळ, शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर, श्याम उमाळकर, गणेश पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

 पुढे बोलतांना खा. वासनिक यांनी कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे यांच्याशी झालेल्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला. स्व. बाळकृष्ण वासनिक यांना १९७९ ला बुलडाणा लोकसभेचे तिकीट जाहीर झाल्यानंतर आम्ही संपूर्ण कुटुंब चिखलीत तात्यासाहेबांकडे आलो, त्यावेळी मी कॉलेजला शिकत होतो. विद्यापीठाच्या क्रिकेट संघात प्रवेश होण्यासाठी त्यावेळी मी प्रयत्न करीत होतो, मात्र बुलडाण्याचे तिकीट जाहीर झाल्यावर ते हुकले.१७७९ ला तात्यासाहेबांशी झालेली ती पहिली भेट होती. पहिल्याच भेटीत त्यांनी  आम्हाला आपलंस केलं असे खा.मुकुल वासनिक म्हणाले.

rb

  आई वडिलांची सेवा करणारी माणसंच आयुष्यात १०० टक्के यशस्वी होतात - पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने

   राहुल बोंद्रे यांनी आईवडिलांची खूप सेवा केली. आईवडिलांला शब्द खाली न पडू देणे ही आपली संस्कृती, ती राहुल बोंद्रे यांनी जोपासली. आईवडिलांची सेवा करणारी माणसंच आयुष्यात यशस्वी होतात असे प्रतिपादन पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यावेळी म्हणाले. स्व. तात्यासाहेबांनी रुग्णसेवा केली, तीच परंपरा महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून राहुल बोंद्रे पुढे नेत आहेत असेही ते म्हणाले. यावेळी उपस्थितांना आपल्या भाषणातून त्यांनी आरोग्य विषयक सल्लाही दिला. मोबाईलचा वापर कमी करावा, स्क्रीन टाईम जेवढा जास्त तेवढे आयुष्य कमी म्हणून २ तासांपेक्षा अधिक स्क्रीन टाईम नसावा. झोपण्याआधी किमान २ तास आधी मोबाईल बंद करावा असेही डॉ.तात्याराव लहाने म्हणाले. तात्यासाहेबांनी माळरानावर नंदनवन फुलवल असे म्हणत आ.किरण सरनाईक यांनी स्व. आदरांजली वाहिली. स्व. तात्यासाहेबांनी विज्ञान आणि अध्यात्माची सांगड घातली. विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवून त्यांनी चिखलीत इंजिनिअरिंग कॉलेज सुरू केलं, सोबत अध्यात्म देखील जोपासल. स्व. तात्यासाहेब ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व होते. राहुल बोंद्रे जेव्हा जेव्हा अडचणीत यायचे तेव्हा तेव्हा स्व. तात्यासाहेबांचा सल्ला घ्यायचे, त्यानंतर सगळ्या अडचणी दूर व्हायच्या असे प्रतिपादन माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी केले. स्व. तात्यासाहेबांच्या प्रेरणास्थळाच्या प्रवेशद्वारावर "आम्ही वैकुठांशी आलो याची कारणासी" या जगद्गुरु संत तुकोबारायांच्या ओळी लिहाव्यात अशी अपेक्षा या हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केली.

rb

 आमदार झाल्यानंतर तात्यासाहेबांशी पहिली भेट झाली. रस्त्यात गाडी थांबून ते बोलायचे.त्यांच्या स्वभाव अतिशय विनम्र होता असे माजी आ.रेखाताई खेडेकर म्हणाल्या. स्व. तात्यासाहेब तपस्वी म्हणजे तपस्वी माणूस. एवढं सगळ निर्माण करून त्यागाच्या भावनेतून वानप्रस्थाश्रम स्वीकारणे सोपे नाही, जगात सर्वात कठीण गोष्ट त्याग आहे, ती स्व. तात्यासाहेबांनी करून दाखवली असे प्रतिपादन  ॲड. गणेश पाटील यांनी केले.स्व. तात्यासाहेबांनी गोरगरीब रुग्णांची सेवा केली. चिखली शहरात शिवसेनेच्या वतीने पहिली रुग्णवाहिका सुरू केली तेव्हा तिचे उद्घाटन स्व. तात्यासाहेबांच्या हस्ते झाल्याची आठवण शिवसेनेचे जिल्हा संपर्क नरेंद्र खेडेकर यांनी सांगितली. स्व. तात्यासाहेबांचा स्वभाव चिवट होता, अशक्य वाटतील त्या गोष्टी त्यांनी करून दाखवल्या. ठरवलं ते करायचं असा त्यांचा स्वभाव होता असे प्रतिपादन श्याम उमाळकर यांनी केले..

rb

 १२ सप्टेंबर यावर्षीपासून प्रेरणा दिवस म्हणून साजरा करणार - राहुल बोंद्रे

  कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतेवेळी वडिलांबद्दल बोलतांना राहुल बोंद्रे यांना गहिवरून आले होते. भाऊंनी अनेक संस्था उभ्या केल्या. चिखली नगरपालिकेचे थेट जनतेतून नगराध्यक्षपद त्यांनी भूषवले. एकदा विधानसभा गाजवावी असे त्यांना वाटत होते मात्र ते होऊ शकल नाही. अनुताईंच्या जाण्याने त्यांना मोठा धक्का बसला. मात्र त्यानंतर तब्बल २३ वर्षे ते वानप्रस्थाश्रम जगले, साधना केली. त्यांनी त्या परिसराला देवभूमी अस नाव दिलं होतं, आता त्या परिसराला तपोभूमी अस नाव दिल्याचं राहुल बोंद्रे यांनी प्रास्ताविकातून सांगितलं. जेव्हा जेव्हा या परिसरात येऊन बसतो तेव्हा तेव्हा कितीही ताण असला तरी   शांतता वाटते, एक वेगळी ऊर्जा मिळते असेही ते म्हणाले. गेल्या ३० वर्षांपासून १२ सप्टेंबर या तात्यासाहेबांच्या जन्मदिनी आरोग्य शिबिराचे आयोजन अनुराधा परिवाराच्या वतीने करण्यात येत होते, ती परंपरा आता अविरत जपल्या जाणार आहे. यापुढे १२ सप्टेंबर हा दिवस अनुराधा परिवाराच्या वतीने प्रेरणा दिवस म्हणून साजरा करणार असल्याचे राहुल बोंद्रे यावेळी म्हणाले. भाऊंचा महाप्रयत्नवादावर विश्वास होता तो महाप्रयत्नवाद आम्ही अंगिकारणार असल्याचे राहुल बोंद्रे म्हणाले. स्व. बाळकृष्ण वासनिक आणि मुकुल वासनिक यांनी वडिलांना खूप मदत केली असेही राहुल बोंद्रे म्हणाले. प्रेरणास्थळाचा भूमिपूजन सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा होता अशा प्रतिक्रिया कार्यक्रमानंतर उपस्थितांनी व्यक्त केल्या.