संविधान जागर यात्रेचा चौथा दिवस गाजला! बोरगाव काकडे, तेल्हारा,पेठ, उत्रादा गावात दमदार स्वागत; राहुल बोंद्रे म्हणाले,
आम्ही विकल्या जाणार नाही,आमचा संविधानावर विश्वास! आज पाचव्या दिवसाचा मुक्काम शिरपूर येथे
२७ जानेवारीपासून सुरू झालेली संविधान जागर यात्रा ९ दिवसांत चिखली विधानसभा मतदारसंघातील १०२ गावांचा प्रवास करणार आहे. काल, ३० जानेवारीला संविधान जागर यात्रेचे डासाळा, टाकरखेड, करवंड, खामखेड, गोंधनखेड, कव्हळा, सावरखेड नजिक, करणखेड, दहीगाव, बोरगाव काकडे, तेल्हारा,पेठ आणि उत्रादा गावात जोरदार स्वागत झाले. रात्री १० नंतर देखील पेठ आणि उत्रादा गावातील सभांना चांगलीच गर्दी जमली होती. गावागावात मिळणाऱ्या जोरदार प्रतिसादामुळे प्रत्येक गावात पोहचण्यासाठी नियोजित वेळेपेक्षा उशीर होत होता.
आज ५ वा दिवस...
संविधान जागर यात्रेचा आज,३१ जानेवारीला ५ वा दिवस आहे. काल, रात्री यात्रा धोत्रा भनगोजी येथे मुक्कामी होती. आज सकाळी धोत्रा भनगोजी येथून यात्रेला सुरुवात झाली. ही यात्रा आज आंधई, शेलोडी, शेलसुर, धोडप, डोंगरशेवली तर दुपारनंतर किन्होळा, वाडी ब्रह्मपुरी, केळवद, शिरपूर या गावांत पोहचणार आहे. संविधानाच्या रक्षणासाठी या यात्रेत बहुसंख्येने सहभागी होण्याची आवाहन चिखली विधानसभा काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे.