"बाप तो बाप रहेगा"! खा. जाधवांच्या विजयी मिरवणुकीत बुलडाण्यात डिजेवर वाजतयं गाणं...! खा. जाधवांवर गुलालाची उधळण....
Jun 4, 2024, 16:35 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत आज खासदार प्रतापराव जाधव यांनी दणक्यात विजय मिळवला. शांतीत क्रांती करणे म्हणजे काय असते हेच खासदार जाधव यांनी दाखवून दिले. मतदान झाल्यानंतर जो तो उमेदवार आपापल्या विजयाचे दावे करत असताना खा.जाधव मात्र शांत होते. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र खेडेकर तर खासदार झाल्याच्या अविर्भवात होते, मात्र त्यांना निवडणुकीत यश मिळाले नाही. मतमोजणीच्या सर्वच फेऱ्यात ते पिछाडीवर होते. अखेर प्रतापराव जाधव यांनी ३४८२३८ एवढी मते घेत २९३७६ मतांनी विजयावर शिक्कामोर्तब केले. दरम्यान विजयानंतर प्रतापराव जाधव यांची जंगी विजयी मिरवणूक निघाली. प्रतापराव जाधव यांच्या अंगावर गुलालाची व फुलांची उधळण करण्यात येत आहेत. शिवसैनिक डिजेच्या तालावर थिरकत आहेत, यावेळी "बाप तो बाप रहेगा " या गाण्यावर विजयी मिरवणुकीत शिवसैनिकांनी चांगलाच ठेका धरत तुफान घोषणाबाजी केली...