अमृतमहोत्सवी वर्षातही जिल्ह्याचे मागासलेपण कायम! 76 वर्षांत जनता चुकली की नेते चुकले? संदीप शेळकेंचा रोखठोक सवाल;

म्हणाले नेत्यांनी विकासकारण ऐवजी निव्वळ राजकारणच केले, चिंचोली येथील सभेत केला नेत्यांचा पंचनामा
 
Jdjx
शेगाव (बुलढाणा लाईव्ह वृत्तसेवा): स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातही बुलढाणा जिल्ह्याचे मागासलेपण व अविकसितपणा कायम असल्याचे दुर्देवी चित्र आहे. यामुळे या 76 वर्षांच्या दीर्घ काळात मतदारानी चुक केली की नेतेच चुकले? असा रोखठोक सवाल वन बुलढाणा मिशनचे संस्थापक संदीपदादा शेळके यांनी केला आहे.

आजवरच्या खासदारांनी विकासकारण ऐवजी निव्वळ राजकारणच केल्याने क्षमता असूनही जिल्ह्याचे मातेरे झाले, असे टीकास्त्र त्यांनी सोडले. वन बुलढाणा मिशनच्या वतीने काढण्यात आलेल्या परिवर्तन रथ यात्रेदरम्यान शेगाव तालुक्यातील 

चिंचोली येथील जाहीर सभेत बोलताना त्यांनी हा घणाघात केला.
 
गावकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद लाभलेल्या या सभेत बोलतांना संदीप शेळके यांनी रोखठोक भाषण करीत ग्रामस्थांच्या टाळ्या घेतल्या. माता आणि माती यात केवळ विलांटीचा फरक आहे. माता जन्म देते ते माती कुशीत घेते , अन्न देते. या माता आणि मातीला वंदन करून त्यांनी भाषणाची दमदार सुरुवात केली. जिजाऊंच्या जिल्ह्याला संस्कृती, अध्यात्म, कृषी, वन संपदा, साहित्य याची परंपरा लाभली आहे. मात्र 76 वर्षांत जिल्ह्याचा विकास मात्र आहे तिथेच आहे. यासाठी जिह्यातील खासदार , आमदार जवाबदार आहेत, असा खुला व गंभीर आरोप त्यांनी केला. 
 
सभेत आक्रमकपणे बोलताना संदीपदादांनी शेतकरी, कष्टकरी अन बेरोजगार युवकांच्या व्यथा, वेदना मांडल्या मागासलेला जिल्हा म्हणून बुलढाण्याचा उल्लेख होतो तेंव्हा माझ्या आणि आपल्या सर्वांच्या मनाला वेदना होतात. यासाठी जिल्ह्यातील नेतेमंडळी, खास करून आमदार खासदार जवाबदार असल्याचा थेट आरोप त्यांनी केला. जिल्ह्यातील शेतकरी चौफेर संकटात अडकला आहे. खरीप हंगाम उध्वस्त झालाय, रब्बीला अवकाळीचा फटका बसला. मागील वर्षीच्या अतिवृष्टीच्या नुकसानीचे, पिकविम्याचे पैसे अजून मिळाले नाहीत. काही मदत मिळाली तर शेतकऱ्यांचे बँक खाते होल्ड करण्यात येते. सिसीआयची कापूस खरेदी सुरू नाही, शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही. यामुळे जगाचा पोशिंदा समजल्या जाणाऱ्या बळीराजाच्या हाल अपेष्ठांना पारावार उरला नाही. असे भीषण चित्र असताना जिल्ह्याचे खासदार संसदेत तर आमदार विधानसभेत मौनव्रत धारण करून बसतात. 
हौस वा करिअर म्हणून राजकारणात नाही आलो
हे चित्र बदलण्यासाठी परिवर्तन ही काळाची गरज ठरली आहे. त्यासाठीच मी राजकारणात आलोय असे सांगून मी या क्षेत्रात करिअर, व्यवसाय करण्यासाठी आलो नाही. जिल्ह्यातील विकास हा माझी तळमळ आहे, माझी धडपड आहे. 
मला खासदारकीची संधी दिली तर जिल्ह्याचा चौफेर विकास करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करू अशी ग्वाही त्यांनी दिली. सर्व तालुक्यात खासदार संपर्क कार्यालय सुरू करून नियमित जनता दरबार भरवण्यात येईल. यामुळे नागरिकांना त्यांच्या कोणाच्याही कामासाठी जिल्ह्यापर्यंत येण्याची गरज भासणार नाही. आज मी केवळ साधारण कार्यकर्ता असताना शाहू परिवाराच्या माध्यमांने शेकडो युवक युवतींना रोजगार दिला आहे.हजारो बचत गटांना भरघोस मदत करून महिलांना स्वावलंबी व उद्योजक बनविले आहे.जिल्ह्याच्या विकासाचा आराखडा आपण तयार केला आहे. खासदार म्हणून जनतेने संधी दिल्यास सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबध्द असल्याचे शेळके म्हणाले. 
 भीषण चित्र
देशाला स्वतंत्र मिळून ७६ वर्ष होत आली. या दिर्घ काळात जिल्ह्याचा विकास तर सोडा पण पिण्यासाठी शूद्ध पाणी देखील हे नेतेमंडळी देऊ शकली नाही, अशी घणाघाती टीका शेळके यांनी यावेळी बोलतांना केली. जिल्ह्यातील खारपान पट्टयातील गावांच्या व नागरिकांच्या दुर्दशेवर त्यांनी खंत व्यक्त केली.
७६ वर्षात गावातील हजारो नागरिकांना पिण्यासाठी शुध्द देऊ शकत नाही. असे नेते काय कामाचे? असा खडा सवाल त्यांनी केला. जिल्ह्यातील सहकार क्षेत्र या नेतेमंडळींनी उध्वस्त केले. तरुणांना रोजगार देणाऱ्या एमआयडीसी कडे त्यांनी दुर्लक्ष केले. यामुळे जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना कामासाठी महानगरामध्ये जावे लागते. यापेक्षा दुर्दैव ते काय? अशी मनस्वी खंत त्यांनी व्यक्त केली. याकडे नेत्यांचे सोयीस्कर दुर्लक्ष होत असून हे चित्र बदलण्यासाठी आपण जनतेचा उमेदवार म्हणून जनतेच्या पाठबळाने आणि जनतेसाठी खासदारकिसाठी लढणार असे ते म्हणाले.