Amazon Ad

जिल्ह्यातल्या ५९ हजार ६३५ जणांना घरी बसून करता येणार मतदान कोण आहेत हे"स्पेशल"? बातमीत वाचा...

 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्यात आचारसंहिता लागू झालेली आहे. २६ एप्रिल रोजी बुलढाणा मतदार संघाची निवडणूक होणार आहे. त्यामध्ये आजघडीला २० लाख ५३ हजार १२५ मतदारांची संख्या आहे. त्यामधून ५९ हजार ६२५ इतके ८५ ते ११० वयोगटातील ज्येष्ठ मतदार आहेत. त्यापैकी घरी बसून मतदान करण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या नागरिकांना विशिष्ट सुविधेसह घरातच मतदान करता येणार आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर प्रशासकीय कर्मचारी घरोघरी जावून ज्येष्ठ नागरिकांचा (८५ वर्षावरील) तसेच दिव्यांगांचा मतदानाचा पर्याय जाणून घेत आहेत. घरी बसून मतदान करण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्यांना (१२ ड) विशिष्ट फॉर्म भरून मतदानाची सुविधा उपलब्ध करून देत आहेत. 

हे मतदान घरी बसून मतदानाचा निर्णय घेणाऱ्यांचे मतदान अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पुलिंग बूथ आणून करता येणार आहे. यामध्ये बॅलेट पेपर द्वारे मतदान होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. व्हिडीओ रेकॉर्ड करून मतदान करता येणार आहे. कोणीही मतदानापासून वंचित राहू नये यासाठी हा प्रयत्न आहे. निवडणुकीत पारदर्शकता यावी यासाठी ५० टक्के पोलीस स्टेशन वेब कास्टिंगला जोडली जाणार आहे. पूर्वी काही ठरवल जात असतं. त्यावेळी ५० टक्के पोलीस स्टेशन शोधले जाणार, गर्दीची क्रिटिकल पोलीस स्टेशन घेतली जाणार, कंट्रोल रूम करण्यात येणार, थेट लिंक निवडणूक आयोगाकडे पण जाते. निवडणुकीबाबत पोलीस तयारी सुरू असून ते पण सुसज्ज आहेत. निवडणुकीसाठी निवडणूक विभागासह संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.