मातृतीर्थाचा विकास आराखडा आभासी ठरणार नाही! सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा विश्वास; राजमाता जिजाऊंच्या टपाल तिकिटाचे अनावरण!

आ.डॉ.शिंगणे म्हणाले, सिंदखेडराजाचा विकास आम्हीच करणार, तो कसा करायचा हे आम्हाला चांगलच माहीत, कुणी येऊन सांगण्याची गरज नाही..
 
Ndnd
सिंदखेडराजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मातृतीर्थ सिंदखेडराजा ही ऊर्जाभूमी आहे या शक्ती स्थानावर राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या टपाल तिकिटाचे अनावरण करताना अत्यंत आनंद होतो आहे. या भूमीचा सर्वांगीण विकास आता राज्य सरकार करेल, या शहराचा विकास आराखडा आभासी असणार नाही, असा विश्वास राज्याचे सांस्कृतिक कार्य तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे व्यक्त केला.
Add
सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने शहरातील काही ऐतिहासिक वास्तूंच्या विकास कामांचे भूमिपूजन मंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमानंतर पंचायत समिती मैदानात आयोजित सभेत मुनगंटीवार बोलत होते. यावेळी पालकमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे, आमदार संजय कुटे, आमदार श्वेता महाले, आमदार आकाश फुंडकर, माजी आमदार चैनसुख संचेती, विजयराज शिंदे, नगराध्यक्ष सतीश तायडे,नाझेर काझी, विनोद वाघ, जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील, संभाजीनगर डाक विभागाचे पोस्टमास्तर जनरल अदनान अहमद, तहसीलदार सचिन जयस्वाल, बीडीओ डॉ. श्रीकृष्ण वेनिकर यांची प्रमुख उपस्थिती होती.शिवतीर्थावर एका
जिजाऊंचा विचार पुढे नेणार : पालकमंत्री
  माँसाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार प्रेरक आहेत. त्यांच्या विचारांवरच राज्याची प्रगतीकडे वाटचाल सुरू आहे. त्यांचे विचार पुढे नेण्यात येणार आहे, असे पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले..
आ. डॉ. शिंगणे म्हणाले, "हे" कुणी सांगण्याची गरज नाही...
आम्हीच या मातृतीर्थ सिंदखेडराजाचा विकास करणार आहोत आम्ही या पावन भूमीतील नागरिक आहोत, जिजाऊंचे भक्त आहोत येथील विकास कसा करायचा हे आम्हाला चांगलंच माहीत आहे, ते कुणी येऊन आम्हाला सांगण्याची गरज नाही. आम्ही येथील सर्वांगीण विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहोत. आज तयार असलेला विकास आराखडा येत्या लोकसभा निवडणुकीपूर्वी घोषित होईल याचा पुनरुच्चार आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केला.