मी पणा सोडणाऱ्या लोकांमुळे देश मोठा होतो! पद्मश्री डॉ. हिम्मतराव बावस्कर यांचे प्रतिपादन; म्हणाले, तरुणांनो मातीशी नाळ कधीच तोडू नका! माँ जिजाऊ अर्बन च्या वतीने डॉ. बावस्करांचा सन्मान

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मरण्यापूर्वी देशासाठी काय केले हे सांगता आलं पाहिजे. जीवनात देशासाठी शक्य होईल ते प्रयत्न करा. सोबतच मातीची नाळ कधीच तोडू नका. असे सांगून माती कधी सेकंड हॅन्ड होत नसते. मातीची नाळ जोडतो तो देशसेवाच करीत असतो असे प्रतिपादन पद्मश्री डॉ. हिम्मतराव बावस्कर यांनी केले.

 Llll

    ( जाहिरात👆)

डॉ. हिम्मतराव बावस्कर यांचा सन्मान आज बुलढाणा येथील माँ जिजाऊ अर्बन च्या वतीने करण्यात आला.डॉ. बावस्कर यांनी विंचू व सर्प दंश यावर जागतिक कीर्तीचे संशोधन करून लाखोंना जीवदान देण्याचे काम केले. याबद्दल भारत सरकारने त्यांना नुकतेच पद्मश्री हा देशाचा मनाचा किताब देऊन गौरवांकित केले आहे. आज ते बुलडाणा येथे आले असता माँ जिजाऊ अर्बन परिवाराच्या वतीने संस्थेच्या कार्यालयात त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. समीर पऱ्हाड होते तर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाळाभाऊ भोंडे, ह.भ. प विकास बाहेकर, ह.भ. प भिकाजी तायडे, पत्रकार रणजीत सिंग राजपूत, संस्थेचे उपाध्यक्ष शिवाजी तायडे, सचिव नितीन जाधव, रामेश्वर साखरे, डॉ.शरद काळे, विलास भगत पत्रकार गणेश निकम केळवदकर आदी उपस्थित होते

 पुढे बोलताना पद्मश्री डॉ. बावस्कर म्हणाले की बुलडाणा जिल्ह्यात किडनी रोगाने मृत्यू होण्याचे प्रमाण मोठे होते. मला अनेकदा याविषयी वर्तमानपत्रात वाचायला मिळायचे. परंतु नेमके मृत्यूचे कारण काय ? असा प्रश्न होताच. त्यासाठी मी खारपणपट्ट्यात स्वतः फिरलो. माती आणि पाणी परीक्षण केले. अमेरिकेच्या लॅबचही यासाठी सहाय्य घेतले. यासाठी लाखोंचा खर्च आला ,तोही केला परंतु स्फुरद ची मात्रा व त्यातून होणारे किडनीचे नुकसान पुढे आले. यावर  संशोधन करून उपाय शोधता आले. हे प्रमाण आता ०.३० टक्क्यावर आणण्यात यश आले आहे.संशोधन कोणतेही असू देत त्याची सुरुवात कुटुंबातून होते. मुलांना घेऊन अभ्यास करणारे पालक खरे तर मुलांचे नुकसान करतात. त्याला त्यांचे काम करू दिले तर तो सक्षमपणे उभा राहतो असे सांगून पद्मश्री बावस्करांनी जिजाऊं अर्बनच्या कार्याची स्तुती केली. मी पणा  विसरणार्‍या माणसांमुळे देश मोठा झाला आहे असे त्यांनी सांगितले.

संस्थेचे अध्यक्ष डॉ. समीर पऱ्हाड यांनी पार्श्वभूमी विशेष केली. पद्मश्री डॉ. बावस्करांनी लाखो लोकांचे प्राण वाचविणारे संशोधन पुढे आणले त्यांचे कार्य एखाद्या प्रेषिता सारखेच असल्याचे डॉ.पऱ्हाड म्हणाले. यावेळी त्यांनी संस्थेच्या वतीने त्यांचा  स्मृतीचिन्ह देऊन सन्मान केला. संस्थेचे उपाध्यक्ष शिवाजी तायडे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामाची भूमिका विषद केली. पद्मश्री बावस्करांचे कार्य मानव मुक्तीचे असल्याचे शिवाजी तायडे यावेळी म्हणाले. ह. भ. प विकास बाहेकर ,आहार तज्ञ डॉ. हिंगणे ,ह. भ. प भिकाजी तायडे, यांनीही विचार व्यक्त केले. संचलनाच्या माध्यमातून रणजीत सिंग राजपूत यांनी मौलिक माहिती देऊन जिल्हा आगमन प्रसंगी पद्मश्री बावस्करांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास व्यवस्थापक मनोज तायडे, डॉ शरद काळे, विलास भगत व कर्मचारी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.