मेहकर बसस्थानकाचे बांधकाम रेंगाळत! उद्धव ठाकरेंची शिवसेना आक्रमक;आशिष रहाटेंचा आगार प्रमुखाच्या कार्यालयात ठिय्या!

विभाग नियंत्रक फोनवर म्हणाले, कॉन्ट्रॅक्टर खासदार साहेबांचा; रहाटे म्हणाले, कुणाचाही असुदेत, कारवाई करा! १५ दिवसांचा दिला अल्टिमेटम

 
fghj
मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मेहकर बस आगारात आज ६ जुलैच्या दुपारी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आशिष रहाटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. २०१९ ला मेहकरच्या नविन आगाराचे काम मंजूर झाले, मात्र ते रेंगाळले आहे. त्यामुळे पर्यायी बसस्थानकावर प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. पावसामुळे प्रवाशांना उभे रहायला जागा नाही, माता भगिनींना स्वच्छता गृहाची सुविधा नाही. त्यामुळे तात्काळ काम सुरू करावे. कामाला विलंब करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी आशिष रहाटेंनी निवेदनाद्वारे केली. १५ दिवसांत कामाला सुरुवात न झाल्यास शिवसेना स्टाईल आंदोलन करू असा इशारा द्यायलाही रहाटे विसरले नाहीत. दरम्यान, यावेळी आशिष रहाटे यांनी  विभाग नियत्रकांना फोन करून परिस्थिती अवगत करून दिली, मात्र विभाग नियत्रकांनी दिलेल्या अजब उत्तरामुळे सारेच हैरान झाले.
 

"मी विभाग नियत्रकांना फोन करून मेहकर आगाराचे काम लवकर सुरू करण्याची मागणी केली, तेव्हा कॉन्ट्रॅक्टर खासदार साहेबांचाच आहे,"असे विभाग नियंत्रक म्हणाल्याचे आशिष रहाटे यांनी "बुलडाणा लाइव्ह" शी बोलताना सांगितले. कॉन्ट्रॅक्टर कुणाचा आहे याच्याशी आम्हाला काहीही देणे घेणे नाही, विनाकारण कामाला विलंब करणाऱ्या  व निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करण्याची मागणी केल्याचे आशिष रहाटे यांनी सांगितले. सरकारने ७५ वर्षांवरील नागरिकांना मोफत प्रवास, महिलांना तिकिटात ५० टक्के सवलत अशा योजना चालू केल्या आहेत. त्यामुळे बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी होत आहे. पर्यायी बसस्थानकावर  चोऱ्या छेडखानीच्या घटना वाढल्या आहेत. पाऊस असल्यास प्रवाशांना उभे राहणे देखील अडचणीचे ठरत आहे या बाबी आशिष रहाटे यांनी निवेदनाच्या  माध्यमातून निदर्शनास आणून दिल्या आहेत
  

१५ दिवसांच्या आत कामाला सुरुवात करावी अन्यथा उद्धव बाळासाहेब  ठाकरेंची शिवसेना तीव्र आंदोलन करेल असा इशारा यावेळी आशिष रहाटे यांनी दिला. यावेळी  तालुका प्रमुख निंबाजी पांडव, उपतालुका प्रमुख रमेश देशमुख, शहर प्रमुख किशोर गारोळे, कृषी उत्पन्न  बाजार समितीचे संचालक स्वप्नील गाभने, युवासेना शहर प्रमुख आकाश घोडे, ऋषी जगताप, विभाग प्रमुख नारायण बळी, साहेबराव हिवाळे, मारोती जुनघरे, संदीप गवई, भागवत पारस्कर, विलास शिंदे, अमोल बोरे, शुभम पानखेडे,अमोल मोरे , हर्षल देशमुख, ओम नरवाडे, पवन आसाबे,प्रीतम देशमुख, सुमित कुकडे, सोनू जाधव,  भागवत बोरकर, सागर जाधव, सनी चव्हाण, राहुल गिरी, रितेश गायकवाड, ऋतिक पानखेडे, महेश गायकवाड, किरण जाधव, गोविंद गायकवाड, अस्लम शेख, संदीप गारोळे, वैभव निकम, मंगेश नेमाडे, विकी माने उपस्थित होते.