जिल्हाधिकारी कार्यालयच असुरक्षित! जिल्हा सूचना विज्ञान केंद्रातील बॅटऱ्या चोरीस
असतात. शांत व संयमी बुलढाणा शहर अलीकडच्या काळात लहान मोठ्या घटनांनी चर्चेत येत असते. जिल्हा मुख्यालयाच्या गल्ल्या बोळ्यांमध्ये अवैध व्यवसायांनी आधीच डोके वर काढलेले आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून पोलीस यंत्रणा परिश्रम घेत असताना जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिचर चोरट्यांचा रडावर आला आहे.
या कार्यालयातील एनआयसी अर्थात राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्रामध्ये मुख्य दरवाज्याच्या गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश करत युपीएच्या बॅटरी बॅकअपसाठी लावलेल्या १९ पैकी १२ बॅटरी लंपास केल्या. सुमारे ७ हजार १०० रूपये किंमती नुसार तब्बल ८५ हजार २०० रूपयांचा या बॅटऱ्या होत्या. याप्रकरणी जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी सुनील अरविंदराव खुळे रा. चैतन्यवाडी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीचा ऐवज मोठा नसला तरीही जिल्हाधिकारी कार्यालयात चोरी होणे, हीच बाब पोलिसांपुढे नमके आव्हान आहे.