BREAKING लोकशाहीच्या महोत्सवाला सुरुवात! बुलडाणा लोकसभेसाठी २६ एप्रिल रोजी मतदान; ४ जून ला मतमोजणी;आदर्श आचारसंहिता लागू

 
गद्य
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): होय.. २० लाखांवर बुलडाणेकर मतदारांना ज्याची उत्कंठा होती त्या लोकशाहीच्या महामहोत्सवाला आजपासून सुरुवात झाली. केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला असून संपूर्ण देशात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. ७ टप्प्यात संपूर्ण देशभरात लोकसभेसाठी मतदान होइल. तर ४ जूनला मतमोजणी होणार आहे.
 बुलडाणा लोकसभा मतदारसंघापुरते बोलायचे झाल्यास बुलडाणा लोकसभेसाठी २ ऱ्या टप्प्यात २६ एप्रिल रोजी रोजी मतदान होणार आहे. २८ मार्चला निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध होइल. ४ जूनला बुलडाण्याचा खासदार कोण होईल याचे उत्तर मिळणार आहे. दरम्यान आजपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली असून राजकीय पक्ष जोमाने तयारीला लागले आहेत.