बूथ कमिटी सदस्यांचा मेळावा ही लोकसभा निवडणुकीच्या विजयाची नांदी! वन बुलडाणा मिशनच्या मेळाव्यात संदीप शेळकेंचे प्रतिपादन;

म्हणाले, खासदार म्हणून नाही तर लोकसेवक म्हणून काम करणार! मेळाव्याला प्रचंड गर्दी अन् कार्यकर्त्यांची उस्फुर्त भाषणबाजी...
 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): वन बुलडाणा मिशनच्या बूथ कमिटी सदस्यांचा हा भव्य मेळावा म्हणजे आगामी लोकसभा निवडणुकीतील आपल्या विजयाची नांदी आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी आपण सुरू केलेल्या वन बुलडाणा मिशन या राजकीय लोकचळवळीला गावखेड्यात जोरदार प्रतिसाद मिळत आहे. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही आजघडीला आमची निवडणूक जर रस्ते आणि नाल्या या मुद्द्यावर होत असेल तर ही खेदाची बाब आहे. वन बुलडाणा मिशनने त्यापलीकडे जाऊन जिल्हाचा सर्वांगीण विकास हे ध्येय डोळ्यासमोर ठेवले आहे. लोकप्रतिनिधींनी ज्यांच्या भरवश्यावर निवडणूक आलो अशा लोकांना सन्मान देणे गरजेचे आहे. मायबाप जनतेने संधी दिली तर आपण खासदार म्हणून नव्हे तर लोकसेवक म्हणून काम करणार असल्याचे प्रतिपादन वन बुलडाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके यांनी केले. वन बुलडाणा मिशनच्या वतीने आज,३ फेब्रुवारीला बुलडाण्यात आयोजित बूथ कमिटी सदस्यांच्या मेळाव्यात संदीप शेळके बोलत होते. बुलडाणा शहरातील चिखली रोडवरील साईकृपा लॉनवर संपन्न झालेल्या या मेळाव्याला जिल्हाभरातील प्रत्येक गावातील बूथ कमिटीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  पुढे बूथ कमिटी सदस्यांना संबोधित करतांना संदीप शेळके म्हणाले की, ही लढाई जिल्ह्याच्या विकासासाठी आहे. या लढाईत तुम्ही आणि मी मावळे म्हणून उतरलो आहोत. जिल्हाचा विकास हे काही बाजारबुणग्या लोकांचे काम नाही असे संदीप शेळके म्हणाले.
परिवर्तन म्हणजे काय?
Ggg
वन बुलडाणा मिशन ही परिवर्तनाची चळवळ आहे. मात्र परिवर्तन म्हणजे केवळ चेहरा बदलणे नाही, संदीप शेळकेंना खासदार करणे म्हणजे परिवर्तन नाही तर जिल्ह्याचा धार्मिक, शैक्षणिक, औद्योगिक, पर्यटनदृष्ट्या, सांस्कृतिक सर्व प्रकारचा विकास ही आमची परिवर्तनाची संकल्पना आहे असे संदीप शेळके म्हणाले.
P Ss
    
लोकप्रतिनिधींना सवाल विचारा
आमच्या जिल्ह्यात सोयाबीन कापूस या पिकांवर अवलंबून असलेले शेतकरी आहेत. सोयाबीन कापसाला भाव नाही.पण सोयाबीन कापूस पट्ट्यातून संसदेत गेलेले खासदारांनी या विषयावर काय काम केलं हे त्यांना विचारलं पाहिजे. नुकताच अर्थसंकल्प सादर झाला, पर्यटनासाठी २४०० कोटींची तरतूद झाली पण त्यातून आमच्या लोणार सरोवराला काय मिळणार? मातृतीर्थ सिंदखेडराजाला काय मिळणार याचा सवाल आपण इथल्या लोकप्रतिनिधींना केला पाहिजे असे संदीप शेळके म्हणाले.
वन बुलडाणा मिशन ही चळवळ सुरू केली तेव्हा इथले प्रस्थापित आपल्यावर हसत होते, आता मात्र आपल्याला गावखेड्यातून मिळणारा प्रतिसाद पाहून, आजचा हा बूथ कमिटी सदस्यांचा मेळावा पाहून त्यांना हादरे बसत आहेत असे संदीप शेळके म्हणाले.
साडेअकरा वाजेपर्यंत हवा येऊ द्या कार्यक्रम चालतो...
People
खेळ पैठणीचा हा कार्यक्रम १५ मिनिटे उशिरापर्यंत चालला म्हणून पोलिसांनी आमच्यावर गुन्हे दाखल केले. मात्र तिकडे नेत्यांच्या वाढदिवसाला चला हवा येऊ द्या कार्यक्रम रात्री साडेअकरा पर्यंत चालला, रात्री बारा वाजता तलवारीने केक कापला तरी ते लोकप्रतिनिधी असल्याने त्यांच्यावर गुन्हा नाही असे म्हणत संदीप शेळके यांनी नाव न घेता खा.जाधव यांच्यावर निशाणा साधला. पोलिसांनी असा भेदभाव करणे बरे नाही असेही ते म्हणाले.
१० फेब्रुवारीपासून जिल्ह्यात परिवर्तन रथयात्रा...
  दरम्यान येत्या १० फेब्रुवारीपासून आपण जिल्ह्यात परिवर्तन रथयात्रा काढणार आहोत, प्रत्येक तालुक्यात गावागावात जाणार आहोत अशी घोषणा यावेळी संदीप शेळके यांनी केली. लोकसभा निवडणुकीत वन बुलडाणा मिशनच्या एका कार्यकर्त्याने २५ घरांची जबाबदारी स्वतःच्या खांद्यांवर घ्यावी, येणाऱ्या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान करून घेण्यावर भर द्यावा असेही संदीप शेळके यावेळी म्हणाले. या मेळाव्याचे प्रास्ताविक पुरुषोत्तम जाधव , सूत्रसंचालन प्रख्यात निवेदक गणेश धुंदळे यांनी तर आभार नितीन उबाळे यांनी मांडले.
उस्फुर्त भाषणबाजीने कार्यकर्त्यांना स्फुरण...
Ggg
 या मेळाव्यात प्रारंभी गाव खेड्यातून आलेल्या बूथ कमिटी सदस्यांनी, तालुका समन्वयक यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा.अनिल ढगे, मेजर सुरोशे, सागर सिरसाठ, समाधान शेळके , रावसाहेब देशमुख यांची भाषणांनी बूथ कमिटी सदस्यांना चांगलेच स्फुरण चढले होते..