Amazon Ad

चिखलीत ७ सप्टेंबरला विदर्भातील मोठी दहीहंडी! ५ लाख ११ हजार १११ रुपयांची बक्षिसे;आ. श्वेताताई महालेंकडून आयोजन

 

चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आ. श्वेताताई महाले यांच्या संकल्पकनेतून दरवर्षी आयोजित केली जाणारी विदर्भातील सर्वात मोठी दहीहंडी यंदा ७ सप्टेंबर रोजी चिखली येथे मोठ्या जल्लोषात पार पडणार आहे. यावेळी पाच लाखांहून अधिक रकमेच्या बक्षीसांची लूट केली जाणार आहे. या दहीहंडीच्या प्रचार चित्राचे अनावरण भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते २ सप्टेंबर रोजी करण्यात आले.

भाजपाच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्याला संबोधित करण्यासाठी बावनकुळे चिखली येथे आले असता त्यांनी आ. श्वेताताई महाले यांच्यासह पक्षाच्या मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत व शेकडो कार्यकर्त्यांच्या साक्षीने या दहीहंडीच्या प्रचारचित्राचे अनावरण त्यांनी केले. आ. श्वेताताई महाले यांच्या माध्यमातून चिखली मतदारसंघात होणारा विकास व राबवले जाणारे सांस्कृतिक उपक्रम अतिशय उपयुक्त असल्याचे प्रतिपादन आ. बावनकुळे यांनी यावेळी केले.  

अभिनेत्री शाजान, श्रुती अन् इशाचा उत्सवात सहभाग

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये ७ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेपासून या दहीहंडी उत्सवाला सुरुवात होईल. आ. श्वेताताई महाले यांच्या मार्गदर्शनात भाजपा युवा मोर्चाच्या वतीने या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. शाजान पदमसी, श्रुती मराठे आणि इशा केसकर या टीव्ही स्टार अभिनेत्रींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा दहीहंडी उत्सव आयोजित केला आहे. या उत्सवात भाग घेणाऱ्या मंडळांना एकूण ५ लाख ११ हजार १११ रुपयांची बक्षीसे आयोजकांच्या वतीने देण्यात येणार आहेत.