चिखलीत आज विदर्भातील सर्वात मोठी दहीहंडी! तुफान गर्दी जमणार; आमदार श्वेताताई महाले यांचे आयोजन! सिनेअभिनेत्री श्रुती मराठे, शाजान पदमसी, ईशा केसकर राहणार प्रमुख आकर्षण...

 
Bxhdh
चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): केवळ बुलडाणा जिल्ह्यातीलच नव्हे तर विदर्भातील सर्वात मोठी दहीहंडी म्हणून परिचित असलेला चिखलीतील भारतीय जनता युवा मोर्चाचा दहीहंडी सोहळा आज,७ सप्टेंबरच्या संध्याकाळी चिखलीत रंगणार आहे. सिनेअभिनेत्री श्रुती मराठे, शाजान पदमसी, ईशा केसकर या आजच्या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरणार आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देखील या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. आमदार श्वेताताई महाले यांच्या मार्गदर्शनात भारतीय जनता युवा मोर्चाने या सोहळ्याची जय्यत तयारी केली आहे.
चिखली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हा सोहळा संपन्न होणार आहे. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी या सोहळ्यात ५ लाख ५५ हजार ५५५ हजार रुपयांच्या बक्षिसांची लूट गोविंदा पथकांना कार्य येणार आहे. या सोहळ्याला अभूतपूर्व गर्दी उसळणार आहे. बुलडाणा लाइव्ह च्या युट्युब चॅनल वर या सोहळ्याचा थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.