BIG BREAKING बुलडाण्यात वातावरण टाईट..! तारखांना हजर न राहणे प्रकरण आमदार संजय गायकवाडांच्या अंगलट! न्यायालयाचा दणका...

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. २०१२ मध्ये शहरात दोन गटात तुफान हाणामारी झाली होती. आ.संजय गायकवाड व तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दत्ता काकस यांच्या गटात झालेल्या राड्यात दोन्ही गटांवर कलम ३०७ सह विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते. सध्या प्रकरण न्यायालयात होते, मात्र तारखांना हजर न राहणे आमदार संजय गायकवाड यांना महागात पडले आहे.
आमदार गायकवाड गटातील आरोपी न्यायालयात तारखांना हजर राहत नव्हते. त्यामुळे न्यायाधीशांनी आरोपींचे अटकेचे वॉरंट काढले होते. आरोपींपैकी काहींनी आज न्यायालयात अटक वॉरंट रद्द करण्यासाठी अर्ज केला होता, मात्र न्यायालयाने तो फेटाळला. आमदार गायकवाड यांच्या गटातील १४ आरोपींना तात्काळ अटक कारागृहात पाठवण्यात आले. अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये आमदार संजय गायकवाड यांचा समावेश नाही. दरम्यान शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या वतीने जमानतीसाठी अर्ज दाखल केला असून त्यावरील सुनवाई नुकतीच संपली. मात्र अद्याप त्यावरचा निकाल आला नाही.
कोर्ट परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त...
दरम्यान या प्रकरामुळे न्यायालय परिसरात वातावरण टाईट असून तगडा पोलीस बंदोबस्त तैनात आहे. सध्या या प्रकरणावर कुणीही बोलायला तयार नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार न्यायालयाने बुलडाणा शहर पोलिसांनी चांगलीच कानउघाडणी केली आहे. दरम्यान अद्याप आमदार गायकवाड यांना पोलिसांकडून अटक करण्यात आलेली नाही. न्यायालयाने याधीच काढलेल्या अटक वॉरंट मध्ये आमदार संजय गायकवाड यांचे नाव आहे,त्यामुळे पुढे काय होतेय याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.