चिखलीत नवनिर्वाचित संचालकांनी मानले मतदारांचे आभार! काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे म्हणाले,
सत्ताधाऱ्यांनो सूडबुद्धीचे राजकारण करू नका, सुसंस्कृतपणा जोपासा! नरेंद्र खेडेकरांनी धृपदराव सावळेंना लगावला टोला; म्हणाले, आतापर्यंत अडगळीत पडले होते...
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): नुकत्याच पार पडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत जिल्ह्यातील १० पैकी ७ बाजार समित्यांवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला. या निवडणुकी दरम्यान सत्ताधाऱ्यांनी वापरलेली सर्व शस्त्रे बाद करीत चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सर्वाधीक मताधिक्याने दिलेला विजय ऐतिहासीक आहे. हा महाविकास आघाडीवर मतदारांनी दर्शविलेला विश्वास व महाविकास आघाडीतील एकजुटीचा परिणाम आहे. सत्ताधाऱ्यांनी सुडबुद्धीचे राजकारण न करता सुसंस्कृतपणा जोपासला पाहीजे, असा मौलीक सल्ला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी दिला. महाविकास आघाडीच्या नवनिर्वाचीत संचालकांच्या वतीने चिखली येथील मौनीबाबा संस्थान येथे आयोजित आभार मेळाव्यात ते बोलत होते.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, बाजार समितीच्या ऐन निवडणुकीच्या तोंडी बळीराजा पॅनलच्या ११ उमेदवारांची उमेदवारी रद्द ठरली . असे असतांनाही बळीराजा पॅनलच्या उमेदवारांना मतदारांनी एकतर्फी कौल दिला आणि आमच्या १७ जागा प्रचंड मतांनी विजयी झाल्या. त्यामुळे हा विजय ऐतीहासीक असल्याचे राहुल बोंद्रे म्हणाले. विजयाचे शिल्पकार असलेले सरपंच, उपसरपंच, सदस्य, सोसायटी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, अडते, व्यापारी तसेच ज्यांनी या निवडणुकीत जिवाचे रान केले अशा सर्व घटकांचे आभार मानण्याकरिता आयोजित या मेळाव्याला माजी आमदार रेखाताई खेडेकर, हर्षवर्धन सपकाळ, शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, शेतकरी नेते एकनाथराव थुट्टे यांची विशेष उपस्थिती होती.
या निवडणुकीत विरोधकांनी विविध आमिषे दाखवित पैशांचा पाऊस पाडला परंतु तरीही मतदारांनी महाविकास आघाडीच्या पाठिशी भक्कपणे बळ उभे करून भाजपा - शिंदे गटाचा सुपडासाफ केला.
जिल्हयातील बाजार समित्यांपैकी
सर्वाधीक मताधिक्याने मतदारांनी
ऐतिहासीक विजय मिळवुन दिला, हे केवळ महाविकास आघाडीच्या एकजुटीमुळेच शक्य झाले. येत्या काळात शेतकरीहीत जोपासून बाजार समितीचे उत्पन्न वाढविण्यासाठी वचनबध्द असल्याचे प्रतिपादन यावेळी राहुल बोंद्रे यांनी संचालकांच्या वतीने केले.
अडगळीत पडलेले धृपदराव अचानक बॅनरवर दिसू लागले: नरेंद्र खेडेकर
बाजार समितीच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांकडे सगळ काही होत. ही निवडणूक आतापर्यंत झालेल्या निवडणुकांपेक्षा वेगळी होती. भाजपा आणि १० महिन्यांपूर्वी ज्यांनी गद्दारी केली त्या मिंधे गटाला जनतेने धडा शिकवला असा टोला शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर यांनी लगावला. इथल्या आमदारांनी सत्तेचा वापर केला, पोलीस बोलावले,पाकीट वाटले, तलाठी बोलावले मात्र लोकांना तिरस्कार होता असेही खेडेकर म्हणाले. काही वर्षांपासून अडगळीत पडलेल्या धृपदराव सावळेंचे फोटो या निवडणुकीत अचानक बॅनर वर दिसले,ते पाहून अनेकांना आश्चर्य वाटले असा टोलाही नरेंद्र खेडेकर यांनी लगावला. मतदारांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्याची जबाबदारी आता निवडून आलेल्या संचालकांची आहे. बाजार समितीच्या कायद्यांचा अभ्यास संचालकांनी करावा, चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीचे उत्पन्न कसे वाढवता येईल यादृष्टीने देखील विचार व्हावा असा सल्ला माजी आमदार रेखाताई खेडेकर यांनी नवनिर्वाचित संचालकांना दिला.यावेळी जालिंदर बुधवत, एकनाथ थुट्टे, विष्णू कुळसुंदर यांनीही मनोगत व्यक्त केले. संचालन डॉ. संतोष वानखेडे तर आभार प्रदर्शन डॉ. सत्येंद्र भुसारी यांनी केले. यावेळी ज्योतीताई खेडेकर, दिपक देशमाने, नंदु कऱ्हाडे, डॉ. इसरार, विश्वासराव खंडागळे, अतहरोद्यीन काझी, संजय गाडेकर, कुणाल बोंद्रे, संचिन बोंद्रे, दिपक म्हस्के, सुनील तायडे, गजानन लांडे, अशोकराव पडघान, सुभाष देव्हडे, बिदुसिंग देव्हडे, बिदुसिंग इंगळे, जगन्नाथ पाटील, रवि तोडकर, भगवानराव काळे, दत्ता सुसर, प्रमोद पाटील, दिलीप वानखेडे, विनायक सरनाईक, डॉ. भगवान उबंरकर, मनोज खेडेकर, लखन गाडेकर, शेषराव कानडजे, विष्णु मुरकुटे, माणिकराव खांडवे यांची व्यासपिठावर उपस्थिती होती.
संचालकांनी केली पुष्पवृष्टी
नवनिर्वाचीत संचालक पांडुरंग भुतेकर, समाधान सुपेकर, श्रीकिसन धोंडगे, डॉ. संतोष वानखेडे, रामभाऊ जाधव, समाधान परीहार, रामेश्वर खेडेकर, संतोष वाकडे, गणेश थुट्टे, कमलताई कुळसुंदर, मंदाबाई भुतेकर, मनोज लाहुडकर, परमेश्वर पवार, श्रीकृष्ण मिसाळ, संजय गवई, जय बोंद्रे, निरज चौधरी यांनी सभा ठिकाणी मोठया संख्येने उपस्थित असलेल्या मतदार व नागरिकांवर पुष्पवृष्टी करून त्यांचे आभार मानले.