खा.प्रतापराव जाधवांचे माझ्यावर उपकार! त्यांनी तिकीट दिल्यामुळेच आमदार झालो! ही उपकाराचे परतफेड करण्याची वेळ! आ.संजय गायकवाडांचे कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन! विरोधकांना म्हणाले, चभरेपणा करू नका...

 
Hbbv

बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खासदार प्रतापराव जाधव यांनी उमेदवारी दिली नसती तर माझ्यासह अनेक  कार्यकर्त्यांचे   जीवन उद्ध्वस्त झाले असते. याची जाण ठेवून खासदार प्रतापराव जाधव यांना एक लाखापेक्षा अधिक देऊन निवडून आणा असे भावनिक  आवाहन शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी कार्यकर्त्यांनी केले.धामणगाव बढे येथे  महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते.  ही सभा गुरुवारी सायंकाळी घेण्यात आली. यावेळी सभेला मंत्री गुलाबराव पाटील, महायुतीचे  अधिकृत उमेदवार प्रतापराव जाधव, भाजपाचे नेते योगेंद्र गोडे, माजी आमदार विजयराज शिंदे, शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत,  शिवसेना किसान सेना जिल्हाप्रमुख संदीप गायकवाड, राष्ट्रवादी महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनुजाताई सावळे,  महाराष्ट्र राज्य युवासेना कार्यकारणी सदस्य युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड,   बलदेवराव चोपडे, जिल्हा परिषद सदस्य तथा राष्ट्रवादी बुलढाणा तालुका अध्यक्ष डी. एस. लहाने आदि उपस्थित होते. 

 पुढे बोलताना आमदार गायकवाड म्हणाले की माझा ३५ वर्षाचा राजकीय कडवा संघर्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार प्रतापराव जाधव यांनी मला उमेदवारी देऊन संपविला. अन्यथा माझ्यासह मागील ३५ वर्षापासून एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचे राजकीय सामाजिक जीवन उद्धव झाले असते.  गद्दारी आ. संजय गायकवाडच्या रक्तात नाही, संजय गायकवाड यांनी कधीही बेईमानी केली नाही. खा. प्रतापराव जाधव यांनी मला उमेदवारी दिली. त्‍यामुळे माझा व माझ्या कार्यकर्‍त्यांचा राजकिय वनवास संपला. माझे व कार्यकर्‍त्यांचे  राजकिय जीवन उध्दस्थ होण्यापासून वाचले. याची परतफेड करण्याची ही वेळ आहे. खा. जाधव यांचे उपकार फेडण्याची हीच संधी आहे. त्‍यामुळे कार्यकर्त्यांनी त्‍यांना एक लाखापेक्षा जास्त मतांनी निवडूण आणावे असे आवाहन आ.गायकवाड यांनी केले.
विरोधकांना म्हणाले,चबरेपणा करू नका..
महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ भाषणात बोलताना शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी विरोधकांना सज्जड दम देत चांगलेच धारेवर धरले. यावेळी त्यांनी चौफेर टीका केली खासदार प्रतापराव जाधव हे तीन टर्म खासदार राहिलेले आहेत. मंत्री राहिलेले आहेत आणि विरोधक साधी ग्रामपंचायत सुद्धा लढले नाही. ते १२ ते १४ वर्षाचे शेंबडे पोर बोलताना खालच्या स्तरावर बोलत आहेत. तुम्हाला निवडणूक लढायची की सरळ सरळ लढायचे हे ठरवून घ्या. निवडणूक लढवायची असेल तर मतदारांना सांगा मी काय करेल ते. उगाच कोणाला नाव ठेवू नका,  अन्यथा आम्ही बाळासाहेबाचे सैनिक आहोत. जे जे चबरेपणा करतील त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले जाईल, असा दम ही त्‍यांनी दिला. विरोधकाकडील सगळे नाटक संपले आहेत. आता एकच फंडा बाकी आहे. आता ते स्वतःचं डोकं फोडून घेतील,  जाळपोळ करतील,  एखादी गाडी जळतील आणि नाव प्रतापरावांचे घेतील. अशा खोट्या अफवांना मतदारांनी बळी पडू नये. विरोधकांच्या केविलवाण्या बुध्दीची किव करीत ते म्हणाले की, ज्यावेळेस त्यांच्याकडे लाल दिवा होता यांनी शेतकऱ्यांसाठी काहीही केले नाही. चार वर्षे लाल दिवा होता तर यांनी बुलढाण्यात टेक्स्टाईल पार्क आणला नाही. शेतकऱ्यांच्या मुलांना न्याय का दिला नाही.  हे म्हणायचे की मी लाल दिवा काही समजत नाही. लाल दिवा  घेऊन मी संडासाला जातो.  ज्यांना लाल दिव्याची गरीमा माहीत नाही,   या लाल दिव्याच्या आधारे त्या शेकडो नागरिकांना  न्याय देऊ शकतात हे माहित नाही, ते खासदार झाल्यावर देखील म्हणतील मी संसदेत संडासाला जातो अशी उपहासात्‍मक टिका आ.गायकवाड यांनी केली.
Ggggh
      Advt