Amazon Ad

मेहकरात तणाव वाढला! "पन्नास खोके एकदम ओके" ची घोषणाबाजी! पोलिसांनी पुन्हा निर्णय बदलला; तुपकरांना घेऊन पोलीस पुन्हा बुलडाण्याकडे

 
मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना अटकेनंतर पोलिसांनी मेहकर पोलीस ठाण्यात नेले होते, मात्र मेहकरात तणाव निर्माण झाल्याने पोलीस प्रशासनाने निर्णय बदलला आहे. तुपकर यांना पुन्हा बुलडाण्यात आणण्यात येणार असल्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे..

रेल्वे रोको आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर बुलडाणा पोलिसांनी तुपकर यांना अटक केली होती. मात्र बुलडाण्यात न ठेवता तुपकर यांना मेहकर येथे हलविण्यात आले होते. ही वार्ता पसरताच जिल्हाभरातील शेकडो शेतकरी सुद्धा मेहकर पोलीस ठाण्यासमोर जमले. तिथे चांगलाच तणाव निर्माण झाला. पन्नास खोके एकदम खोके अशी घोषणाबाजी झाली. परिस्थिती चिघळण्याची शक्यता पाहता पोलिसांनी तुपकर यांना पुन्हा बुलडाणा येथे हलवण्याचा निर्णय घेतला आहे..