भाजप नेते नारायण राणे यांच्यावर कायदेशीर कारवाई करा! अन्यथा जनआंदोलन.. काँग्रेस कमिटी लोणारचे निवेदन!

 
Congress
(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा लोणार) शंकराचार्य यांचे योगदान काय? असा प्रश्न करून भाजपचे नेते नारायण राणे यांनी शंकराचार्य यांचा अपमान केला आहे. त्यामुळे राणेवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अन्यथा जन आंदोलन करण्याचा इशारा लोणार तालुका काँग्रेसच्या वतीने आज १५ जानेवारीला देण्यात आला. यासंदर्भात तहसीलदारांकडे निवेदन सुपूर्द करून भाजप नेते नारायण राणे यांचा निषेध करण्यात आला.
यावेळी लोणार तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेश मापारी व शहर अध्यक्ष शेख समद शेख भाजपा नेते व केंद्रीय यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन करण्यात आले. मंत्री नारायण राणे यांनी हिंदु धर्माचे सर्वोच्च आचार्य शंकराचार्य यांचे योगदान काय ? असा प्रश्न विचारून शंकराचार्य यांचा अपमान केला आहे. काँग्रेस पक्ष शंकराचार्य यांचा अपमान सहन करणार नाही.
भाजप नेते नारायण राणे वर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी, अन्यथा लोणार तालुका काँग्रेस कमेटी च्या वतीने जनआंदोलन करण्यात येईल. याची सर्वस्वी जबाबदारी महाराष्ट्र शासनाची राहील, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.निवेदन देते वेळी तालुकाध्यक्ष राजेश मापारी, शहराध्यक्ष शेख समद शेख अहमद, ज्येष्ठ नेते प्रकाश धुमाळ, माजी पंचायत समिती सभापती ज्ञानेश्वर चिभडे, नगरसेवक संतोष मापारी, शेख रऊफ शेख महबूब, ओबीसी सेल शहराध्यक्ष अंबादास इंगळे, माजी नगरसेवक प्रा सुदन कांबळे, शहर काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष रामचंद्र कोचर, युवक काँग्रेस शहराध्यक्ष विकास मोरे, नगराध्यक्ष मनीष पाटोळे,माजी नगरसेवक शंकर हेंद्रे, माजी नगरसेवक शेख असलम शेख कासम, उद्धव बाळासाहेब गटाचे लुकमान कुरेशी, आप्पा शिंदे, शुभम चाटे, केतन बाजाड, आदी उपस्थित होते.