शेतकऱ्यांवर लाठीमार करणाऱ्यांवर कारवाई करा!अजितदादा पवार झाले आक्रमक!सभागृहात मांडला स्थगन प्रस्ताव; विधान परिषदेचे विरोधी पक्षेनेते आ. दानवेंनेही मांडला मुद्दा

 
yuyu
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात बुलढाण्यात झालेले आत्मदहन आंदोलन आणि या आंदोलनात शेतकऱ्यांवर झालेला लाठीचार्ज हा अमानवीय असून पोलिसांची ही कारवाई म्हणजेच पूर्वनियोजीत कट होता, असा संशय यांच्या एकंदरीत कारवाईतून दिसून येतो. या प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी आज २८ फेब्रुवारी रोजी सभागृहात स्थगन प्रस्ताव मांडताना केली. शिवाय विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आ. अंबादास दानवे यांनी देखील सभागृहात बोलतांना या विषयाकडे लक्ष वेधले. शेतकरी काय दहशतवादी आहेत का  ? असा सवालही यावेळी आ. दानवे यांनी सरकारला विचारला.

 विधान सभेचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी आपल्या प्रभावी शैलीत बुलढाण्यातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा विषय मांडला. पिकविमा, अतिवृष्टी, सोयाबीन - कापसाची दरवाढ यासाठी तुपकरांच्या नेतृत्वात आंदोलन झाले, शेतकऱ्यांचे आंदोलन मोठे होते, पश्न जिव्हाळ्याचा होता मात्र यावेळी पोलिसांनी लाठीमार केला. राज्याच्या सोयाबीन उत्पादनाच्या तुलनेत ४० टक्के उत्पादन आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी करतो. शेतकऱ्यांना यामध्ये तोटा होत आहे. सायोबीनचा उत्पादन खर्च ५७०० आणि मिळणारा भाव ५५०० आहे, कापसाला खर्च येतो ८ हजार क्विंटल आणि भाव आहे ७ हजार त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी तुपकरांच्या नेतृत्वात आंदोलन पुकारले होते.

अहिंसेच्या मार्गाने, लोकशाही मार्गाने हे आंदोलन सुरु असतांना पोलिसांनी बेछुट मारहाण केली, यामध्ये अगदी वयोवृद्ध शेतकरी, महिला, लहान मुलांनाही मारहाण झाली, वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांनाही मारहाण झाली असून हा प्रकार पूर्वनियोजीत होता की काय ? असा संशय पोलिसांच्या एकंदरीत कारवाईतून दिसून येत आहे. तुपकरांना भेटायला आलेल्या आजी - माजी लोकप्रतिनिधींना अडविण्यात आले, ही बाब चुकीची आहे. पोलिसांनी दिलेली ही वागणूक संशयास्पद आहे, रविकांत तुपकर व शेतकऱ्यांना जाणुनबुजून त्रास देण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला आहे, यामध्ये एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाचा जास्त हात असल्याची कुजबूज होती. त्यामुळे लाठीचार्जची सखोल चौकशी करुन दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी अजितदादा पवार यांनी केली. 

 शेतकऱ्यांचे जेव्हा आंदोलन होते तेव्हा लाठीचार्ज किंवा इतर काही गोष्टी करायच्या नाही, सामंजस्याची भूमिका घेऊन शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घ्यायचे. शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये, अशी भूमिका ठेवायची असा निर्णय आम्ही सरकारमध्ये असतांना घेतलेला होता, पोलिसांनी अशी भूमिका ठेवणे आवश्यक होते परंतु त्यांनी शेतकऱ्यांवर अन्याय केला, असेही यावेळी अजितदादा पवार यांनी सांगितले.

पिकविमा, अतिवृष्टीची मदत आणि सोयाबीन-कापसाची दरवाढ यासाठी रविकांत तुपकर यांनी ११ फेब्रुवारी रोजी बुलढाण्यात आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरु असताना पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने परिस्थिती चिघळली होती. शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचा हा प्रकार असल्याने याबाबत सर्वच स्तरातून निषेध नोंदविण्यात आला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आ.अंबादास दानवे यांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत रविकांत तुपकरांचे आंदोलन, पोलिसांचा लाठीचार्ज याचा उल्लेख करुन सरकार शेतकऱ्यांचे आंदोलन मोडून काढत असल्याचा आरोप केला होता, तर २८ फेब्रुवारी रोजी सभागृहात बोलताना त्यांनी तुपकरांचे आंदोलन आणि पोलिसांचा लाठीचार्ज हा विषय मांडत असताना सरकार शेतकऱ्यांना दहशतवाद्यांसारखी वागणूक देत असल्याचे सांगुन लाठीचार्ज प्रकरणी कारवाईची मागणी केली. 

पोलिसांची भूमिका संशयास्पद

अहिंसेच्या मार्गाने आंदोलन सुरु असताना पोलिसांनी बेछुट मारहाण केली, यामध्ये अगदी वयोवृद्ध शेतकरी, महिला, लहान मुलांनाही मारहाण झाली, वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांनाही मारहाण झाली. हा प्रकार पूर्वनियोजीत होता की काय? असा संशय पोलिसांच्या एकंदरीत कारवाईतून येत आहे. रविकांत तुपकर व शेतकऱ्यांना जाणुनबुजून त्रास देण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला आहे, यामध्ये एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाचा हात असल्याची कुजबूज होती. पोलिसांची एकंदरीत वागणूक संशयास्पद होती, अशा शब्दात अजितदादा पवार यांनी पोलिसांच्या कारवाईबाबत तीव्र रोष व्यक्त केला.