दादांच्या प्रचारासाठी ताई मैदानात! सौ. मालतीताई शेळके यांच्या प्रचार दौऱ्याला उस्फुर्त प्रतिसाद! सौ. मालतीताई म्हणाल्या, दादांकडे विकासाची दृष्टी...

 
हद्द
बुलडाणा: बुलडाणा जिल्ह्याच्या विकासासाठी दादांची तळमळ आहे. जिल्ह्याला लागलेले मागासलेपणाचे बिरूद कायमचे पुसून टाकण्याचे त्यांचे ध्येय आहे. सुशिक्षित तरुणांना रोजगार, शेतकऱ्यांचे कल्याण, सामान्य माणसाच्या हिताचे काम करण्यासाठी सुरुवातीपासूनच त्यांनी विशिष्ट धोरणे तयार केली आहेत. संदीप दादांकडे विकासाची दृष्टी आहे असे प्रतिपादन राजश्री शाहू मल्टीस्टेटच्या अध्यक्षा सौ. मालतीताई शेळके यांनी केले. वन बुलढाणा मिशनचे संकल्पक तथा अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभेच्या रिंगणात उतरलेल्या संदीप शेळके यांच्या प्रचारार्थ निघालेल्या प्रचार दौऱ्यात त्या बोलत होत्या.
advt
   Advt.👆
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने संदीप शेळके यांनी याआधीच परिवर्तन रथयात्रेच्या माध्यमातून जिल्हा पिंजून काढला आहे. बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी होणाऱ्या मतदानाच्या दिवसाला बोटावर मोजण्याइतके दिवस उरले आहेत. त्यामुळे आता त्यांच्या अर्धांगिनी तथा राजर्षी शाहू मल्टीस्टेटच्या अध्यक्षा सौ. मालतीताई शेळके यादेखील प्रचारासाठी मैदानात उतरल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांनी संदीप शेळके यांच्या प्रचाराला चिखली तालुक्यातून सुरुवात केली. शेलगाव जहागीर, एकलारा, म. खंडाळा, पाटोडा, भोरसा भोरसी, पेनसावंगी, पांढरदेव नायगाव, त्यानंतर १५ एप्रिलला जांब, मोंडाळा, मसला बुद्रुक, बोधेगाव, ढगारपूर, मसला खुर्द, सातगाव, करडी , सावळी, चांडोळ, इरला रुईखेड, भडगाव या गावांमध्ये मालतीताई पोहोचल्या. दरम्यान आज चिखली तालुक्यातील मलगी या गावातून त्यांनी आजच्या प्रचार दौऱ्याला सुरुवात केली. सकाळी देऊळगाव घुबे, कोनड, पिंपळगाव, मिसाळवाडी शेळगाव वाटोळ, इसरूळ,मंगळूर, या गावांचा पल्ला गाठत दुपारी डोड्रा, अंचरवाडी, अंतत्री खेडेकर, मेरा बु, काठोडा, चंदनपुर, कवठळ या गावांमध्ये त्यांनी मतदारांच्या भेटीगाठी घेत संवाद साधला. द
  
पुढे बोलताना मालतीताई शेळके म्हणाल्या की, संदीप शेळके यांनी जिल्ह्याच्या विकासाचे व्रत स्वीकारले आहे. विकसित जिल्ह्याचे स्वप्न साकार करण्यासाठी ते प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. जिल्ह्याला भौगोलिक, ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा असताना देखील जिल्ह्याला मागासलेपणाच्या यादीत गणल्या जात असल्याचे दुःख सर्वांनाच वाटते. शेतकरी आत्महत्यांच्या प्रकरणात देखील जिल्हा आघाडीवर असल्याची शोकांतिका आहे. ही सगळी विदारकता बदलून जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कल्याण करण्यासाठी, सुशिक्षित तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी संदिपदादा अहोरात्र झटत आहेत. यासाठीच लोकसभा निवडणूक लढवण्याचे त्यांनी ठरवले आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत जनतेने संधी दिल्यास संदीपदादा शेळके जिल्ह्याचा कायापालट करून दाखवतील असेही मालतीताई शेळके म्हणाल्या.