सूर्यनारायण तापले, संदीप शेळके संतापले! म्हणाले प्रस्थापित नेत्यांनी जिल्ह्याचे वाटोळे केले, पण आता हे चालू देणार नाही, पंधरा वर्षे काय खुर्च्या गरम केल्या?

देऊळगाव राजा तालुक्यात परिवर्तन रथयात्रा दणक्यात...
 
बुलडाणा
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आकाशातील सूर्य आता आग ओकू लागला आहे. चांगलाच तापला आहे. इकडे देऊळगाव राजा तालुक्यातील परिवर्तन यात्रेत वन बुलढाणा मिशनचे संदीप दादा शेळके चांगलेच संतापल्याचे दिसून आले. त्यांनी ठिकठिकाणच्या जाहीर सभात खासदार व जिल्ह्यातील प्रस्थापित नेत्यांचा खरपूस समाचार घेतला.
Add
Add
                         (  जाहिरात 👆 )
शाहू परिवाराचे अध्यक्ष यांनी रणरणत्या उन्हाची तमा न बाळगता देऊळगाव राजा तालुक्यात जाहीर सभा व कॉर्नर बैठका घेतल्या. या सभांना जनतेचा उत्साही प्रतिसाद मिळाला. यावेळी बोलताना शेळके यांनी खासदार प्रतापराव जाधव यांच्यावर टीकेची तोफ डागली. तीन टर्म मध्ये काहीच न करणारे खासदार आता आपण जिल्ह्यात उद्योग धंदे आणणार, चौफेर विकास करणार अश्या गप्पा मारत आहे.मागील 5 वर्षात विका सावर न बोलणाऱ्या जाधवांना आता विकास आठवला. मग त्यांनी पंधरा वर्षात काय फक्त खुर्च्या गरम केल्या काय? असा रोखठोक सवाल त्यांनी केला. दुसरे एक नेते, त्यांनी पण अर्ज भरला. आता आमदारकी तुमची, खासदारकीचा फॉर्म ही भरला, मग इलेक्शन च कश्याला घेता? अविरोध च करून घ्याना। असा टोला त्यांनी लगावला. 
आता मात्र हे चालू देणार नाही
    सिंदखेडराजा मतदारसंघातील विकासाची हीच बॉंब आहे. जिल्ह्यातील या नेत्यांनी मिळून जिल्ह्याचे वाटोळे केले, विकासाचे तीनतेरा केल्याची घणाघाती टीका संदीप दादा यांनी केली. मात्रआता ही मनमानी, दादागिरी, कमिंशन खोरी आपण चालू देणार नाही असा दमच दादांनी भरला. या सर्व निष्क्रिय नेत्यांना हद्दपार करण्यासाठी आपण लोकसभेच्या मैदानात उतरलो आहोत.जनता जनार्दन च्या आशीर्वाद ने खासदार झालो तर, जिल्ह्याचे, मतदारसंघासाचा कायापालट करू अशी ग्वाही संदीप शेळके यांनी दिली