BREAKING प्रतापराव जाधव यांच्या समर्थकांचा विजयी जल्लोष; रविकांत तुपकरांच्या कार्यालयासमोर लावले फटाके...

 
बुलडाणा
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा लोकसभा मतदारसंघासाठी आज मतमोजणी होत आहे. खासदार प्रतापराव जाधव यांची विजयाकडे वाचाल होत असून त्यांच्या विजयाची केवळ औपचारिकता शिल्लक आहे. दरम्यान या निवडणुक प्रचारादरम्यान रविकांत तुपकर आणि खासदार प्रतापराव जाधव यांच्यात चांगलीच तुंबळ लढत झाली होती. त्यामुळे खासदार प्रतापराव जाधव यांच्या समर्थकांनी आज रविकांत तुपकर यांच्या चिखली रोडवरील कार्यालयासमोर फटाके फोडले आणि गुलाल उधळला. यावेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र आधीच त्या ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त तैनात केलेला असल्यामुळे वातावरण निवळले. मेहकरच्या युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी रविकांत तुपकर यांच्या कार्यालयासमोर एकच जल्लोष केला..यावेळी खा.जाधव यांच्या समर्थकांकडून प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली.