कोतवाल संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी सुधाकर इंगळे, जिल्हा कार्याध्यक्षपदी अनुप मस्के यांची निवड !
Jun 29, 2024, 17:54 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) आज २९ जून रोजी महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक येथील स्थानिक विश्रामगृहात पार पडली. याप्रसंगी संघटनेतील महत्त्वाच्या पदांसाठी निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्षपदी सुधाकर इंगळे यांची तर जिल्हा कार्याध्यक्षपदी अनुप मस्के यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
Advt.👆
सदर बैठकीचे आयोजन राज्य कोतवाल संघटनेचे विभागीय सचिव डॉ. रवींद्र अंभोरे यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आली. संघटनेला योग्य दिशा देण्यासाठी व जिल्ह्यातील महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी संघटना कार्य करत आहे. या बैठकीसाठी जिल्हाभरातील ११ तालुकाध्यक्ष २ तालुक्यातील प्रतिनिधी उपस्थित होते. या निमित्ताने, कोतवाल संघटनेची एकजूट दिसून आली. इंगळे व मस्के दोघांचीही अविरोध निवड झाली आहे.