संदीप दादा व्हिजन असलेले सक्षम नेतृत्व!मालतीताई शेळके यांचे प्रतिपादन,मालतीताईंनी केला गावोगावी प्रचार! प्रचाराला मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद

 
Bhjb
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) जिल्हा घडवण्यासाठी संदीप दादा व्यापक व्हिजन असलेले सक्षम नेतृत्व असल्याचे प्रतिपादन राजश्री शाहू मल्टीस्टेटच्या अध्यक्षा मालती शेळके यांनी केले. संदीप शेळके यांच्या प्रचारासाठी मालतीताई विविध गावांमध्ये जावून भेटी देत आहेत. दरम्यान, बुलढाणा शहरालगतच्या गावांमध्ये जनतेशी त्या बोलत होत्या. 
 आजपासून केवळ चार दिवस उरले आहेत. २६ एप्रिलला बुलढाणा लोकसभेसाठी मतदान होणार आहे. तत्पूर्वी सर्वच उमेदवार जोरदार प्रचाराला भिडले आहेत. अपक्ष उमेदवार तथा वन बुलढाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके प्रचारात आघाडीवर आहेत. त्यांच्या प्रचारासाठी मालती शेळके ह्या देखील मैदानात उतरल्या आहेत. विविध तालुक्यात त्यांनी प्रचार दौरे केले. आज रविवारी, मालती शेळके ह्या बिरसिंगपूर, मोठा दहीद, पळसखेड नाईक, पळसखेड नागो, पडळी, गिर्डा, चौथा, अटकळ, छोटा दहीद, जामठी, वरुड, पांगरखेड, ढालसावंगी, दुधा, देवपूर, चिखला, हतेडी या गावांमध्ये होत्या. यावेळी ठिकठिकाणी मालती शेळके यांचे स्वागत करण्यात आले. या प्रचार दौऱ्यात महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. दरम्यान जनतेशी संवाद साधताना मालती शेळके म्हणाल्या की, जिल्ह्यात अनेक नेते आहेत परंतु विकासाचे व्हिजन घेतलेले सक्षम नेतृत्व म्हणजे संदीप दादाच आहेत. या आधी प्रसिद्ध उद्योजक म्हणून त्यांची ख्याती होती. परंतु बुलढाणा जिल्ह्याचे मागासलेपणाचा कलंक पुसण्यासाठी संदीप दादांची तळमळ आहे. बुलढाणा जिल्हा विकासाचे मॉडेल ठरले पाहिजे या हेतूने ते काम करत आहेत.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत, सुशिक्षित तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे , यासाठी संदीप दादा
प्रामाणिकपणे लढा देत आहेत. जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर राजकीय व्यवस्थेचा घटक होणे गरजेचे आहे. त्यामुळेच संदीप दादा ही निवडणूक लढत आहेत. संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याचे भवितव्य घडविणारी ही निवडणूक आहे. आज जर आपण विकासासाठी मतदान केले नाही तर, भविष्यात पुढील पिढ्यांसाठी ते धोक्याचे होईल. त्यामुळे विकासाच्या चळवळीमध्ये साथ द्यावी. २६ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी कॅमेरा या चिन्ह समोरील बटन दाबून संदीप दादांना प्रचंड बहुमताने विजयी करा निश्चितपणे, विकसित जिल्ह्याचे चित्र संदीप दादा तयार करतील. असे आवाहन मालतीताई शेळके यांनी केले.