राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आज जिल्ह्यात! वाचा कुठे कुठे जाणार, काय काय करणार...

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर बुलडाणा जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत.आज १३ ऑक्टोबरच्या दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात महिलांच्या जनसुनावणीस त्या उपस्थित राहतील.
नियोजित कार्यक्रमानुसार श्रीमती चाकणकर यांचे काल गुरूवार, दि. १२ ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी आगमन झाले. आज, सकाळी ११:३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जनसुनावणी होईल. त्यानंतर दुपारी ३ वाजता महिला व बालकांच्या प्रश्नांच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय आढावा बैठक घेईल. तसेच सायंकाळी ५ वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. सायंकाळी ६ वाजता बुलडाणा येथील शासकीय विश्रामगृहात मुक्काम करतील. उद्या शनिवार, दि १४ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी १० वाजता सिंदखेड राजा येथील राजमाता जिजाऊ जन्मस्थळाला भेट देतील.त्यानंतर सोईनुसार छत्रपती संभाजीनगरकडे त्या प्रयाण करणार आहेत.