STATE NEWS शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह विकत घेण्यासाठी २ हजार कोटींची डील! खासदार संजय राऊतांचा आरोप; अण्णाभाऊ साठेंच्या कवितेच्या "या" ओळी केल्या शेअर..

 
rane
मुंबई(लाइव्ह ग्रुप नेटवर्क): शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळवण्यासाठी २ हजार कोटी रुपयांची डील झाल्याचा आरोप खासदार संजय राऊत केलाय. ट्विट करून खा.राऊत यांनी हा खळबळजनक आरोप केलाय. या आरोपानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

notis

 "ही माझी खात्रीची माहिती आहे. चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आतापर्यंत २००० हजार कोटींची डील झाली आहे . हा प्राथमिक आकडा आहे आणि १०० टक्के सत्य आहे. बऱ्याच गोष्टी लवकरच उघड होतील. देशाच्या राजकारणात असे कधीच घडले नव्हते" असे ट्विट खा. संजय राऊत यांनी केले आहे. या ट्विट सोबतच त्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कवितेच्या काही ओळी देखील शेअर केल्या आहेत.
   
"ही न्याय व्यवस्था काहिकांची रखेल झाली, ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली! मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे! कारण इथली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली" अशा ओळी राऊतांनी शेअर केल्या आहेत. जो नेता नगरसेवक विकत घेण्यासाठी ५० लाख, नेत्यांना विकत घ्यायला १ कोटी, आमदारांना विकत घेत ५० कोटी आणि खासदारांना विकत घ्यायला १०० कोटी देतो त्यांना निर्णय विकत घेणे सोपेच आहे. काही बिल्डरांनी मला ही माहिती दिली..ती १०० टक्के खरी आहे असे राऊत प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना म्हणाले.