श्रीराम वंदना थोड्याच वेळात साखरखेर्डा येथे पोहचणार...! गावागावात जोरदार स्वागत
Jan 22, 2024, 14:48 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): वन बुलडाणा मिशनची श्रीराम वंदना यात्रा थोड्याच वेळात साखरखेर्डा नगरीत पोहचणार आहे. आज,२२ जानेवारीच्या पहाटे मातृतीर्थ सिंदखेडराजा नगरीतून ही यात्रा सुरू झाली. संत नगरी शेगावात या यात्रेचा समारोप होणार आहे.
वन बुलडाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके यांच्या नेतृत्वात निघालेल्या या यात्रेचे गावागावात रामभक्तांकडून उस्फुर्त स्वागत होत आहे. ठीक ठिकाणी रांगोळी काढून , पुष्पवर्षाव करून यात्रेचे स्वागत होत आहे. साखरखेर्डा नंतर लव्हाळा फाटा, मंगरूळ नवघरे, अमडापुर, उदयनगर, खामगाव मार्गे यात्रा संत नगरी शेगावात दाखल होईल..