वन बुलडाणा मिशनच्या टेंभुर्णा येथील संवाद मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद! संदीप शेळके म्हणाले, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध

 
Obm
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): तालुक्यातील टेंभुर्णा येथे २४ डिसेंबर रोजी वन बुलडाणा मिशनचा संवाद मेळावा संपन्न झाला. राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष तथा वन बुलडाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके यांच्या विकास आणि परिवर्तनाच्या विचाराला जनतेतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सभेला प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता. 
यावेळी बोलतांना संदीप शेळके म्हणाले, वन बुलडाणा मिशनच्या माध्यमातून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत. येणाऱ्या काळात सिंचन, रोजगार, आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण, सैनिक, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, युवकांच्या समस्या सोडवण्यासाठी आपणास सामूहिक प्रयत्न करायचे आहेत. लोकप्रतिनिधिंनी केवळ आश्वासने देण्याचे काम केले. जनतेने त्यांना जाब विचारला पाहिजे. पश्चिम महाराष्ट्रात जनतेचा नेत्यांवर अंकुश आहे. आपल्याकडे उलट परिस्थिती आहे. यामध्ये बदल झाल्याशिवाय विकासाचा गाडा समोर चालू शकणार नाही. याबाबत जिल्हावासीयांनी निर्णय घेण्याची गरज आहे.
देशातील सर्व नागरिकांना घटनेने समान हक्क आणि अधिकार दिलेले आहेत. लोकशाहीत मतदार हा राजा असतो. सुजाण नागरिकांनी जागृत राहून आपला हक्क बजावला पाहिजे, असे आवाहन संदीप शेळके यांनी यावेळी केले.