राजर्षी शाहू मल्टिस्टेटच्या आर्थिक साक्षरता कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद! तुषार डोडिया यांचे मार्गदर्शन; संदीप शेळकेंनीही केले इसरुळकरांच्या जागरुकतेचे कौतुक

 
Jfkfkellzjnmd
इसरुळ (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा) : राजर्षी शाहू मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी अंतर्गत १९ मे रोजी सायंकाळी ग्रा.पं. प्रांगणात आर्थिक साक्षरता अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष तथा वन बुलढाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके यांनी उपस्थित नागरिकांसोबत संवाद साधला. आर्थिक नियोजनाबद्दल ग्रामस्थांमधील जागरुकतेचे त्यांनी कौतुक केले. 

आर्थिक नियोजन काळाची गरज झाली आहे. पैसे प्रत्येक जण कमावतो. मात्र त्याचे योग्य नियोजन सुद्धा आवश्यक आहे. याकरिता राजर्षी शाहू मल्टिस्टेटचे संस्थापक संदीप शेळके यांच्या संकल्पनेतून आर्थिक नियोजन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये यामाध्यमातून जनजागृती करण्यात आली आहे. दरम्यान १९ मे रोजी इसरुळ येथे कार्यक्रम घेण्यात आला.

 

आर्थिक विषयाचे तज्ञ तुषार डोडिया यांनी पैसे कसे वाचवावे, वाढवावे आणि त्याचे नियोजन कसे करावे? याबाबत मार्गदर्शन केले. नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची त्यांनी उत्तरे दिली. 
यावेळी सरपंच सतीश भुतेकर, बाजार समिती संचालक पांडुरंग पाटील, माजी सरपंच सुरेश भुतेकर, श्याम भुतेकर, ओमप्रकाश भुतेकर, दीपक पुंगळे, भिकनराव पाटील, नितीन भुतेकर, गणेश भुतेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.