आतापर्यंत १२ उमेदवारांनी दाखल केले उमेदवारी अर्ज! उद्या अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस; आज ६ उमेदवारांचे अर्ज दाखल! रविकांत तुपकरांनी आज पुन्हा भरला अर्ज..

 

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज ३ एप्रिल पर्यंत १२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. आज ३ एप्रिलला ६ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. उद्या ४ एप्रिलला अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे, उद्या दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज भरता येणार आहे.

आज नंदू जगन्नाथ लवंगे यांनी अपक्ष, उद्धव ओंकार आटोळे अपक्ष, मोहंमद हसन इनामदार यांनी मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी, संदीप शेळके यांनी जंगी शक्तीप्रदर्शन करीत अपक्ष, सुमन मधुकर तिरपुडे यांनी पीपल्स पार्टी ऑफ इंडिया कडून तर आज पुन्हा एकदा रविकांत तुपकर यांनी दुसरा उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून दाखल केला.आता उद्या ४ एप्रिल हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. उद्या महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. ५ एप्रिल रोजी अर्जांची छाननी करण्यात येणार असून ८ एप्रिल पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे.