श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचा संदीप शेळकेंना पाठिंबा! राष्ट्रीय महासचिव म्हणाले, आमचा ८० टक्के राजपूत समाज संदीप शेळकेंच्या पाठीशी...

 
गझनी
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) वन बुलढाणा मिशनचे संकल्पक तथा बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार संदीप शेळके यांना विविध संघटनेचा, समाजातील विविध घटकांचा पाठिंबा मिळत आहे. आता श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेने शेळकेंना पाठिंबा जाहीर केला. करणी सेनेचे राष्ट्रीय महासचिव आनंद सिंग ठोके, प्रदेशाध्यक्ष जीवनसिंग सोळंकी यांनी जाहीरपणे संदीप शेळके यांना पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. यामुळे आधीच विकासाचे व्हिजन असल्याने लोकप्रिय ठरलेल्या संदीप शेळके यांची ताकद वाढली आहे.
Advt
Advt.👆
राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे राष्ट्रीय महासचिव आनंद सिंग ठोके आणि महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष जीवनसिंग सोळंकी यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती दिली. ते म्हणाले की, आमचा ८० टक्के समाज शेळकेंच्या पाठीशी आहे. बुलढाण्यात आमचे संघटन मोठ्या प्रमाणात आहे. शेळके विकासाचे व्हिजन घेऊन प्रामाणिकपणे काम करत आहेत. विकसित बुलढाणा जिल्ह्याचे नाविन्यपूर्ण संकल्पना त्यांनी तयार केली आहे. सुशिक्षित तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी , शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना कार्यान्वित करून त्यांचे कल्याण करण्यासाठी तसेच सर्वसामान्यांच्या विकासासाठी ते कटिबद्ध आहेत. संदीप शेळके यांच्यासारखे सुशिक्षित खासदार जिल्ह्याला गरजेचे आहेत. जिल्हाभरातून त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत असून आम्ही श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या वतीने "जाहीर पाठिंबा देत आहोत" पुढच्या दोन ते तीन दिवसात बुलढाण्यात येऊन करणी सेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी संदीप शेळके यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरणार असल्याचे त्यांनी सांगितले.