"वन बुलडाणा मिशन"ची श्रीराम वंदना यात्रा ठरली डोळ्यांचे पारणे फेडणारी! हजारो रामभक्तांचा सहभाग;यात्रेने खामगाव शहर दणाणले!

एवढी गर्दी अन् उत्साह की......१४ तासांपासून सुरू आहे यात्रा! समारोप शेगावात होणार...
 
Ggj
खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  वन बुलडाणा मिशनच्या श्रीराम वंदना यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आज,२२ जानेवारीच्या सकाळी ६ वाजेपासून सुरू असलेल्या यात्रेला १४ तास उलटून गेले आहेत. मात्र तरीही यात्रेचे संयोजक संदीप शेळके आणि रामभक्तांचा उत्साह तसुभर देखील कमी झालेला नाही. 

मातृतीर्थ सिंदखेडराजा नगरीतून यात्रा सुरू झाली. त्यानंतर किनगावराजा, राहेरी, वीरपांग्रा, दुसरबिड, बिबी, शेंदुरजन, साखरखेर्डा, लव्हाळा फाटा, मंगरूळ नवघरे, उदयनगर मार्गे यात्रा रात्री ९ वाजता खामगाव शहरात दाखल झाली. गावोगावी महिलांनी औक्षण करून, रांगोळ्या काढून, जेसीबी ने पुष्पवृष्टी करून यात्रेचे स्वागत करण्यात येत होते. रथावर विराजमान प्रभू श्रीराम चंद्रांचे विलोभनीय रूप रामभक्त डोळ्यात साठवून घेत होते. खामगाव शहरात देखील या यात्रेचे अतिशय दिमाखात स्वागत करण्यात आले. सध्या यात्रा खामगाव शहरात असून हजारो खामगावकर रामभक्त यात्रेच्या स्वागतासाठी गर्दी करीत आहेत..रात्री उशिरा संतनगरी शेगावात या यात्रेचा समारोप होणार आहे..आजची ही श्रीराम वंदना यात्रा डोळ्यांचे पारणे फेडणारी ठरली एवढे मात्र निश्चीत....